• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: आधी IPL आणि आता टीम इंडिया…सॅम चुका वारंवार करतोय खेळाडू, इंग्लंडविरुद्ध मालिका गमावण्यामागे एकमेव ‘व्हिलन’

July 12, 2026 by admin Leave a Comment


आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय संघ प्रत्येक बाबींसाठी अपयशी ठरला. परिणामी, त्यांना दोन्ही मालिकांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टी  खराब होती. भारतीय संघाने मालिका तर गमावलीच पण त्यापेक्षाही लाजिरवाणी बाब म्हणजे एकही सामना न जिंकता मालिका गमावली. संघाला अनेक गोष्टीवर काम करण्याची नितांत गरज आहे. या दरम्यान पाचवा सामना गमावण्यामागे एक खेळाडू ठरतोय व्हिलन. खेळाडूची एक चूक भारतीय संघाला प्रचंड नडली ज्याचा परिणाम भारतीय संघाने मालिका गमावली.

शिवम दुबे आपल्या स्फोटक फलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान देतो, पण क्षेत्ररक्षणात तो तितकीच माती खातो. आयपीएल 2026 मध्ये अनेक झेल सोडल्याबद्दल त्याला आधीच टीकेला सामोरे जावे लागले होते आणि हाच प्रकार टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही सुरू राहिला. साउथम्पटन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, त्याच्या एका चुकीमुळे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकला जीवदान मिळाले, ज्याने नंतर भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्याच षटकात फिल सॉल्टला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर, सहाव्या षटकात इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्याची आणखी एक संधी निर्माण झाली. प्रिन्स यादवच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर हॅरी ब्रूकचा झेल सुटला. चेंडू यष्टीमागे थर्ड मॅनच्या दिशेने हवेत उंच उसळला.

Shivam Dube’s brain fade in the field costs India a chance as Harry Brook survives pic.twitter.com/ePV7X6tQWp

— RΛM⚝ (@MrcupidforeverX) July 11, 2026

दुबेला झेल घेण्याची संधी होती, पण त्याचा चेंडूचा अंदाज चुकला आणि तो झेल घेण्यासाठी स्वतःला सतत सावरत राहिला. अखेरीस, तो चेंडूपर्यंत पोहोचूही शकला नाही आणि झेल सुटला. त्यावेळी हॅरी ब्रूक केवळ 3 धावांवर फलंदाजी करत होता आणि भारताला 50 धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वी इंग्लंडच्या दोन विकेट्स घेण्याची संधी होती. पण शिवम दुबे, ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने स्वतःला आणि टीम इंडियाला आधीच अनेक वेळा नामुष्की आणली होती, त्याने पुन्हा एकदा चूक केली. ब्रूकने षटकाच्या पुढच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले आणि त्यानंतर अवघ्या 19 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तो शेवटच्या चेंडूपर्यंत शांत राहिला आणि अवघ्या 45 चेंडूंमध्ये 95 धावा करून नाबाद राहिला. त्याने 8 षटकार आणि 4 चौकार मारले. याचा अर्थ, भारतीय संघाचे शिवम दुबेच्या एका चुकीची शिक्षा 92 धावांचे नुकसान झाले.

इतकेच नाही, तर याच काळात ब्रूकने जोस बटलरसोबत 233 धावांची विक्रमी भागीदारीही केली. केवळ दुबेनेच नाही, तर इशान किशननेही ब्रूकला जीवदान दिले. मात्र, हा झेल शेवटच्या षटकात सुटला, जेव्हा ब्रूकने आधीच 90 धावा केल्या होत्या. शतक पूर्ण केल्यावर जोस बटलरलाही जीवदान मिळाले, पण पुढच्याच चेंडूवर सूर्यांश शेडगेकडून त्याचा झेल सुटला. त्यानंतर बटलरने आपल्या धावसंख्येत 29 धावांची भर घातली आणि 131 धावांची संस्मरणीय खेळी करून तो बाद झाला.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in