• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: शुबमनसेना अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार, दुसऱ्यांदाच असं घडणार, नक्की काय?

June 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा आटोपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्याचं वेध लागले आहेत. उभयसंघातील सामना हा 6 जूनपासून न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी काही तासांआधी स्टेडियममध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने स्टेडियममध्ये पोहचताच सरावाला सुरुवात केलीय. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या सरावाचा व्हीडिओ सोशल मीडियावरुन पोस्ट केला आहे. टी 20 स्पर्धा पार पडल्यानंतर चाहत्यांना कसोटी सामन्यानिमित्ताने खेळाडूंची ‘टेस्ट’ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कायम आक्रमकपणे फलंदाजी करणारे खेळाडू किती संयमाने खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हीडिओत टीम इंडियाचे खेळाडू फिल्डिंगचा सराव करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर फलंदाज फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. व्हीडिओत कुलदीप यादव आणि इतर सहकारी गोलंदाज केएल राहुल याला बॉलिंग टाकत आहेत. तसेच यशस्वी जैस्वाल यानेही बॅटिंगचा सराव करण्यावर भर दिला.

टीम इंडियाच्या व्हीडिओत काय?

Back to Test Cricket 🤍

🎥 #TeamIndia hits the nets as the red ball grind gets underway ahead of the #INDvAFG Test 🏏@IDFCFIRSTBank pic.twitter.com/bD3z1osQcB

— BCCI (@BCCI) June 3, 2026

दुसऱ्यांदा नक्की काय होणार?

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांची कसोटी सामन्यानिमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा 2018 साली खेळवण्यात आला होता. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. भारताने तेव्हा अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानवर डावासह एकतर्फी फरकाने विजय मिळवला होता.

न्यू चंडीगडमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामन्याचं आयोजन

कसोटी सामन्यानिमित्ताने भारत विरुद्ध अफगाणिस्तान दोन्ही संघांची 8 वर्षांनंतर आमनेसामने येण्याची ही पहिली वेळ असणार आहे. महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कसोटी सामन्याचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच या मैदानातील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

दरम्यान उभयसंघात एकमेव कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. एकदिवसीय मालिकेत शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. अफगाणिस्तान संघाला आतापर्यंत एकदाही आयसीसी स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यांत टीम इंडिया विरुद्ध विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे अफगाणिस्तान वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in