• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Imtiaz Jaleel : खरंतर दीपके कुटुंबाने शिवसेनेच्या या बड्या नेत्याला घरातच घ्यायला नको होतं, इम्तियाज जलील यांचं स्पष्ट मत

July 27, 2026 by admin Leave a Comment


माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन इम्तियाज जलील यांनी दोन्ही नेत्यांना टार्गेट केलं. “धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागणं हा या आंदोलनाचा निकाल स्वागर्ताह आहे. युवकांनी हुकूमशाही सरकारला संदेश दिला आहे. बस्स, भरपूर झालं आता हा संदेश त्यात दडलेला आहे” असं इम्तियाज जलील म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धर्मेंद्र प्रधानांनी व्यक्तिगत हित नाही, देशहित पाहिलं. संपूर्ण भाजप परिवार तुमच्या पाठिशी आहे. त्यावर जलील म्हणाले की, “यांना इतकं वेड लागलय. फडणवीसांना प्रधानांना सांगितलं पाहिजे होतं की, तुम्ही तुमच्या पदावरुन खाली उतरा. गिरे तो भी टांग उपर असं झालं हे” अशा शब्दात जलील यांनी टीका केली.

मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दीपकेंच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघातील मुलाने क्रांती केली, त्याचा मला अभिमान आहे असही ते म्हणाले. त्यावर जलील म्हणाले की, “खरंतर अभिजीत दीपके कुटुंबाने त्यांना घरात घ्यायला नको होतं. कारण भाजपं-शिवसेना एकच आहेत. एवढचं होतं तर शिरसाट त्यावेळी दिल्लीत का नाही गेले? विद्यार्थ्यांनी त्यांना दाखवलं असतं बरोबर” ‘दीपकेच्या कुटुंबाने संजय शिरसाट यांना घरात नाही घेतलं पाहिजे होतं’ असं इम्तियाज जलील यांचं मत आहे.

हे पहिल्यांदा घडलं आहे

अभिजीत दीपकेची सध्या सगळ्या देशात चर्चा आहे. मागच्या 12 वर्षात विरोधी पक्षांना जे जमलं नव्हतं ते त्याने करुन दाखवलं आहे. इतकं मोठं आंदोलन उभं करुन मोदी सरकारमधल्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची ही पहिली वेळ आहे. याआधी सुद्धा मोदी सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. पण त्याची कारण वेगवेगळी होती. यावेळी एका जनआंदोलनाच्या दबावामुळे एका विश्वासू मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणं हे पहिल्यांदा घडलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 26th August 2026 : नशीब बदलण्याचे संकेत ! आज या राशींना मिळू शकतो मोठा फायदा; तुमची रास यात आहे का?
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! सरकारने दिले रक्षाबंधनचे गिफ्ट, थेट खात्यात…
  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in