• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Update : 21 जुलैची तारीख लिहून ठेवाच! धो धो पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार, नदी-नाले तुडूंब भरणार!

July 15, 2026 by admin Leave a Comment


बंगालच्या खाडीत तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सागरी किनाऱ्यावर कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात तसेच महाराष्ट्रातही पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने आता पावसाचा तसेच हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पूर्व तसेच पुर्वेत्तर भारतात, पूर्व उत्तर प्रदेशात, हिमालय क्षेत्रात अनेक ठिकामी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

येत्या 16 ते 17 जुलै रोजी देशात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठीदेखील महत्त्वाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार 16 ते 21 जुलै या काळात कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस होऊ शकतो.

याच काळात गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे 21 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता असल्याने पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरू शकतो. तसेच धरणं भरण्यातही हा पाऊस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in