• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Alert : वादळ, वारे अन् विजांचा कडकडाट, महाराष्ट्रासह या राज्यांना पाऊस झोडपणार, अलर्ट जारी

June 12, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच आता उद्या (13 जून) देशातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसा, नैऋत्य मान्सूनने पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांमध्ये प्रगती केली असून पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगडच्या उर्वरित भागांमध्येही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात मुसळधार पावसाचा प्रभाव दिसून येणार आहे. कोणत्या राज्यात पावसाचा कहर पहायला मिळणार ते जाणून घेऊयात.

उत्तर भारतात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या काळात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. राजस्थानमधील अनेक भागांमध्ये हवामान बदलणार आहे. काही ठिकाणी धुळीचे वादळ आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बिहार, झारखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पूर्व भारतातील बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहारमध्ये 13 जून रोजी अनेक ठिकाणी पावसासह काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. ओडिशा आणि झारखंडमध्येही पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात भूस्खलनासारख्या घटना घडू शकतात.

ईशान्य भारतात पावसाची शक्यता

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये गेल्या काही काळापासून पाऊस सुरू आहे. आता आसाम आणि मेघालयमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये सततच्या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये वादळी वाऱ्यांचा इशारा

मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यासह तेलंगणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

केरळ, तामिळनाडूत कोसळधार

दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, तेलंगणा, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि अंतर्गत कर्नाटक भागात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ आणि किनारी कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील अनेक भागांमध्ये समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in