• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य, हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेत, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा

July 29, 2026 by admin Leave a Comment


देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) बॉम्बेमधून अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. संस्थेच्या हॉस्टेल परिसरातील आपल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. तर हॉस्टेल परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 जुलै 2026 रोजी रात्री पवई येथील संस्थेच्या परिसरातील हॉस्टेल क्रमांक 4, खोली क्रमांक जी-4147 मध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला आहे…

मृत विद्यार्थ्याचं नाव सोहिल राजकुमार असं असून त्याचं वय फक्त 20 वर्ष होतं. सोहिल मटीरियल सायन्स विभागात दुसऱ्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांने हॉस्टेलच्या खोलीतच स्वतःचा जीवन प्रवास संपवला. घटनेची माहिती मिळताच पवई पोलिस स्टेशन येथील एक पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे… तर पोलीस सध्या याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

कौटुंबिक तणाव आणि वैयक्तिक संबंधांमधील ताण यांची भीती

प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, मृत विद्यार्थी मूळचा राजस्थानमधील पिलानी येथील होता. तपासादरम्यान पोलिसांनी त्या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन आणि चॅट रेकॉर्ड्स तपासले, ज्यातून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या. प्राथमिक माहितीनुसार, तो काही काळापासून कौटुंबिक समस्यांमुळे अस्वस्थ होता आणि आपल्या वैयक्तिक नातेसंबंधातील कठीण परिस्थितीतूनही जात होता.

मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक सामानाची होतोय तपास

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आत्महत्येमागची नेमकी कारणं शोधून काढण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बारकाईने तपासणी केली जात आहे. कोणत्या विशिष्ट दबावामुळे किंवा मानसिक तणावामुळे त्या विद्यार्थ्याने असं टोकाचं पाऊल उचललं आहे का, हे समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव
  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in