• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा चांगलाच तिळपापड, एअर पॉवर रँकिंगवर केली टीका…

July 12, 2026 by admin Leave a Comment


वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) या संस्थेने साल २०२६ साठीची आपली जागतिक वायूसेनेची ताकद असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. अवाढव्य भूभाग आणि अक्राळविक्राळ सैन्यदल पदरी बाळगणाऱ्या चीनच्या वायू दलाचा नंबर भारतीय वायू दलाच्या खाली घसरल्याने चीनचे धाबे दणाणले आहेत. आपण भारतापेक्षा हवाई शक्तीत कमी कसे पडलो या विचाराने चीनची झोपच उडाली आहे. पाकिस्तानचे तर या यादीत नामोनिशान नाहीए…

WDMMA संस्थेने आपली जगातील ताकदवान वायू दल असणाऱ्या देशांची क्रमवारी जाहीर केली आहे.ग्लोबल एअर पॉवरमध्ये भारतीय वायू दलाचा (IAF) क्रमांक ६ वा आला आहे.तर चीनच्या वायू दलाचा क्रमांक भारताच्या खाली ७ वा आला आहे. या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या (PLAAF) ला अशा प्रकारे भारतीय वायू दलापेक्षा कमी गुण दिल्याने चीनमध्ये हडकंप उडाला आहे. चिनी तज्ज्ञ आणि ग्लोबल टाइम्सने या क्रमवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी आणि सरकारी माध्यमांनी या संस्थेच्या गुणपद्धतीवर प्रचंड टीका केली आहे. ही क्रमवारी सदोष असून ती चीनच्या लष्करी ताकद किंवा युद्धासाठीच्या वास्तविक तयारीला अचूकपणे नोंदवू शकलेली नाही अशी टीका चीनच्या ग्लोबल टाइम्सने या सरकारी वृत्तपत्राने केली आहे.

IAF  सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी हवाई शक्ती

‘वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट’ नुसार, भारतीय वायुसेना ( IAF ) ही जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी हवाई शक्ती म्हणून उदयास आली आहे. पहिला क्रमांक १ ) अमेरिकन वायुसेना, दुसरा क्रमांक २) अमेरिकन नौदल, तिसरा ३ ) रशियन वायुसेना, चौथा ४ ) अमेरिकन लष्कर आणि पाचवा ५ वा क्रमांक अमेरिकन मरीन यांना मिळाला आहे. तर भारतीय वायुसेनेला त्यानंतर सहावा क्रमांक ६ ) भारतीय वायुसेना ( IAF ) दिला आहे. तर ७ ) चीनची ‘पीएलएएएफ’ (PLAAF) सातव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानची वायुसेना १८ व्या स्थानावर ढकलली गेली आहे.साल २०२२ पासून सलग पाचव्यांदा भारतीय वायुसेनेने ‘पीएलएएएफ’च्या वरचे स्थान मिळवले आहे.

चीनी अधिकारी म्हणाले ही पद्धत अपुरी

लष्करी सामर्थ्य मोजण्यासाठी संगणकीय अल्गोरिदम आणि बाह्य मूल्यांकन पद्धती ही अपुरी साधने आहेत. खरी कसोटी प्रत्यक्ष युद्धाची तयारी आणि प्रत्यक्ष कारवाया आणि प्रत्यक्ष लढाईतील कामगिरी यामधूनच निश्चित केली जाऊ शकते असे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदलाचे माजी अधिकारी झांग जुन्शे यांनी म्हटले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in