• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IAF : जबरदस्त, अभिमानास्पद बाब, इंडियन एअर फोर्सची कमाल, जागतिक रँकिंगमध्ये चीनला टाकलं मागे, पाकिस्तान तर आसपास पण नाही

July 8, 2026 by admin Leave a Comment


इंडियन एअर फोर्सच्या नावावर अजून एका मोठ्या यशाची नोंद झाली आहे. ग्लोबल एअर पावर रँकिंग 2026 मध्ये इंडियन एअर फोर्सने चीन, जपान आणि पाकिस्तान सारख्या देशांना मागे टाकून टॉप 6 मध्ये स्थान मिळवलं आहे. टॉप 10 लिस्टमध्ये अमेरिकन फोर्सेजचा दबदबा आहे. ‘वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एयरक्राफ्ट’कडून (WDMMA) जगभरातील हवाई शक्तीची माहिती दिली जाते तसचं ग्लोबल मिलिट्री एविएशनच्या जमेच्या बाजू आणि कमतरता समोर आणल्या जातात. WDMMA कडून अनेक आकडे मिळवून रिपोर्ट तयार केला जातो. प्रत्येक एअर फोर्सची किती ताकद आहे, त्या बद्दलची खरी माहिती दिली जाते. WDMMA कडून सध्या 103 वेगवेगळ्या देशांच्या 129 मिलिट्री एअर यूनिट्सच्या एकूण 48,082 एअरक्राफ्टवर लक्ष ठेवलं जातं. जटिल फॉर्मुल्याच्या आधारे WDMMA कडून रँकिंग निश्चित केली जाते. वेगवेगळ्या देशांच्या एअर फोर्सच्या लढाऊ क्षमतेचं आकलन करुन हे रँकिंग बनवलं जातं.

त्यानंतर कॅलकुलेशनद्वारे ‘ट्रू-वैल्यू रेटिंग’ मिळते. ही रेटिंग फक्त एअरक्राफ्टच्या एकूण संख्येच्या आधारावर नाही. टेक्नोलॉजी आधुनिकीकरण, लॉजिस्टिकल सपोर्ट, हल्ला आणि बचाव करण्याची क्षमता या बाबी ध्यानात घेऊन रेटिंग दिलं जातं. म्हणजे एखाद्या देशाकडे किती फायटर जेट्सची संख्या आहे, त्यावरुन नाही तर त्यांचा गुणात्मक दर्जा किती आहे, याचं आकलन करुन रेटिंग दिली जाते. या यादीत अमेरिकेच्या एअर फोर्सचा सर्वाधिक TVR स्कोर 242.9 आहे. ते नंबर 1 आहेत. एक्टिव WDMMA इंडेक्स मध्ये 103 देश आणि 129 एअर सर्विस आहेत.

रँक एअर फोर्स TVR स्कोर
1 USA स्टेट्स एअर फोर्स 242.9
2 यूनायटेड स्टेट्स नेवी 142.4
3 रशियन एअर फोर्स 114.2
4 यूनायटेड स्टेट्स आर्मी 112.6
5 USA स्टेट्स मरीन कॉर्प्स 85.3
6 इंडियन एअर फोर्स 69.4
7 चीन एअर फोर्स 63.8
8 जापानी एअर फोर्स 58.1
9 इस्रायल एअर फोर्स 56.3
10 फ्रेंच एअर फोर्स 55.3

पाकिस्तानची कितवी रँकिंग

पाकिस्तानी एअर फोर्सची 18 वी रँकिंग आहे. त्यांचा 46.3 TVR स्कोर आहे. चायनीज नेवी एविएशनची 15 वी रँकिंग आहे. इंडियन नेवी एविएशन 27 व्या नंबरवर आहे. इंडियन आर्मी एविएशन 36 व्या क्रमांकावर आहे. बांग्लादेश एअर फोर्स 83 व्या नंबरवर आहे. 129 मिलिट्री यूनिट्समध्ये हंगेरी एअर फोर्स 87 व्या स्थानावर आहे. त्याखाली फिनलँड एअरफोर्सचा नंबर येतो. 12.5 टीवीआरसह 88 वी रँकिंग आहे. सर्वात खालची रँकिंग इराणी आर्मी एविएशनची आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर
  • महेश भट्ट यांनी ओशोंची माळ काढून टॉयलेटमध्ये फेकलेली; संतापून विनोद खन्ना म्हणालेले, “देव तुला उद्ध्वस्त..”
  • 15 जुलैला कर्क राशीत गुरू ग्रह होईल अस्त, जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकेल की वाढतील अडचणी
  • मोठी बातमी! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, बंद दालनाआड काय चर्चा?
  • IND vs ENG : श्रेयस अय्यर कॅप्टनशिपच्या बाबतीत सुरुवातीलाच दोन गोष्टींमध्ये कमनशिबी ठरला, अन्यथा त्याची स्टार्ट सुद्धा चांगली झाली असती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in