• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope Today 11th July 2026 : संधी, पैसा की संकट? १२ राशींसाठी आजचा दिवस काय घेऊन आला आहे?

July 11, 2026 by admin Leave a Comment


मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच सकारात्मक ठरणार आहे. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत केल्याने मनाला समाधान मिळेल आणि लोकांमध्ये तुमचा मानही वाढेल. काहीतरी नवीन आणि मोठं करण्याची इच्छा जागी होईल. जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्याचीही चांगली संधी मिळेल. मुलांच्या संगतीकडे आणि त्यांच्या भविष्यासंदर्भात थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – एखाद्यासोबतचे मतभेद मिटवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला, तर नात्यात पुन्हा गोडवा येऊ शकतो. तुमचा आनंदी आणि मनमोकळा स्वभाव आज सर्वांना भावेल. मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा विचार जरूर करा. कुटुंबासोबतचा प्रवास आनंददायी ठरेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – व्यवसाय करणाऱ्यांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल. पैशांच्या बाबतीत घाई करू नका. चुकीचा निर्णय आर्थिक नुकसान करू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर नीट विचार करूनच पाऊल उचला. आईच्या तब्येतीची थोडी काळजी वाटू शकते, तिची नीट काळजी घ्या.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – बऱ्याच दिवसांपासून अडकलेला व्यावसायिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. सर्जनशील किंवा डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास ठरू शकतो. व्यवसायात मोठी संधि मिळेल. वडिलांसोबत एखाद्या मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात, पण शांतपणे बोलल्यास सर्व काही सुरळीत होईल

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – मुलांना नोकरी किंवा करिअरच्या निमित्ताने घराबाहेर जावं लागू शकतं. भावंडांचं सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांसमोर काही अडचणी येतील, पण संयमाने यश मिळेल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – छोट्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि अविवाहितांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते. कुटुंबातील जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, मनस्ताप वाढेल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आजची सुरुवात थोडी संथ होईल, पण दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कुटुंबातील एखादा वाद चर्चेने मिटू शकतो. आज बोलताना शब्द जपून वापरा. घरी पाहुणे आल्याने आनंदाचं वातावरण तयार होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावण्यापेक्षा शांत राहिलात तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. एखाद्या गरजूला मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. प्रवासात एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते, जी पुढे उपयोगी पडेल. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – लांबच्या प्रवासाचा बेत आखला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळेल. अध्यात्म आणि ज्ञानाविषयीची आवड वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. काही नवीन विरोधक समोर येऊ शकतात, त्यामुळे तुमच्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. कर्जासाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळू शकतं. मुलांच्या शिक्षणाबाबतची चिंता कमी होईल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – व्यवसाय किंवा नोकरीत तुमची वेगळी विचारसरणी तुम्हाला खास ओळख मिळवून देईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आई तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीबाबतही चांगली बातमी मिळेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये समतोल राखणं महत्त्वाचं ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. टीमवर्कच्या जोरावर मोठं यश मिळू शकतं. काही लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या समजूतदारपणामुळे आणि सतर्कतेमुळे संकट टळेल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
  • नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
  • पत्नी नको त्या अवस्थेत दिसली, थेट प्रियकरासोबतच लावून दिलं लग्न, नवऱ्याने तो निर्णय का घेतला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in