• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hema Malini : प्रत्येक कोपऱ्यात त्याचीच आठवण… काहीच बदललं नाही; हेमा मालिनींच्या 54 वर्ष जुन्या बंगल्याचे फोटो व्हायरल

July 29, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांचे मुंबईतील जुहू येथील घर म्हणजे केवळ एक बंगला नाही, तर प्रेम, कला आणि आठवणींचा सुंदर खजिना आहे. ‘अद्वितीय’ नाव असलेले हे घर आलिशान महालासारखे भव्य असले तरी त्यातील साधेपणा आणि भावनिक स्पर्श ही त्याची खरी ओळख आहे . अलीकडेच Curly Tales ची होस्ट काम्या जानी यांनी हेमा मालिनी यांच्या या खास घराला भेट दिली. यावेळी ईशा देओल हिने स्वतः घराचा फेरफटका घडवून आणत चाहत्यांना त्या खास कोपऱ्यांची झलक दाखवली, जिथे आजही ड्रीम गर्लच्या आयुष्याच्या अनेक आठवणी जपल्या गेल्या आहेत. ( All Photos :Social Media)

ईशा देओलने सांगितलं की, त्यांच्या घराचे नाव ‘अद्वितीय’ असून त्याचा अर्थ आहे ‘ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असे काहीतरी खास’. हे नाव आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी दिले होते. विशेष म्हणजे, या घराला नाव मिळण्यापूर्वी लोक ते फक्त ‘हेमा मालिनी यांचा बंगला’ म्हणून ओळखत होते.

हेमा मालिनी यांच्या घरात प्रवेश करताच एक क्लासी आणि रॉयल वातावरण अनुभवायला मिळते. गोल्डन बॉर्डर असलेला मोठा विंटेज आरसा, नक्षीकाम केलेले कन्सोल टेबल, अँटिक फर्निचर आणि आकर्षक फुलदाण्या घराच्या प्रवेशभागाला शाही लूक देतात.

या घरातील प्रत्येक भिंत एक कहाणी सांगते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जुन्या आठवणी, कुटुंबातील खास क्षण आणि हेमा मालिनी यांच्या फिल्मी प्रवासातील अनेक खास फोटो घराच्या सजावटीचा भाग आहेत. एका भिंतीवर हेमा मालिनी यांच्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांचा सुंदर कोलाज पाहायला मिळतो, जो त्यांच्या प्रदीर्घ फिल्मी कारकिर्दीची झलक देतो.

हेमा मालिनी यांच्यासाठी सर्वात खास जागा म्हणजे त्यांचा डान्स रिहर्सल हॉल. ईशा देओल यांनी सांगितले की, या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने चप्पल-बूट बाहेर काढावे लागतात, कारण ही जागा त्यांच्यासाठी मंदिरासारखी पवित्र आहे.

या डान्स हॉलमध्ये धर्मेंद्र यांचा मोठा फोटोही लावण्यात आला आहे. ईशा देओल यांनी भावूक होत सांगितले की, त्यांना आजही आपल्या वडिलांची उपस्थिती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते.

घराचा लिव्हिंग एरिया प्रशस्त, सुंदर आणि नैसर्गिक प्रकाशाने भरलेला आहे. हलक्या रंगाचे सोफे, मिंट ग्रीन चेअर्स, मोठे आरसे आणि आकर्षक डेकोरमुळे या जागेला एलिगंट लूक मिळतो.

मात्र या खोलीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या फोटो असलेले कस्टम कुशन्स. ईशा यांनी सांगितले की, हे दोघांच्या ‘ खास सीट्स’. हेमा मालिनी यांच्या फोटोचा कुशन असलेली जागा त्यांची आणि धर्मेंद्र यांच्या फोटोचा कुशन असलेली जागा धर्मेंद्र यांची होती.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
  • WhatsApp हॅकिंगचा धक्कादायक प्रकार, कुरिअरच्या कॉलपासून खेळ सुरू; सुप्रिया सुळे, वनिता खरात यांच्या प्रकरणांनी वाढवली चिंता
  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in