• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hema Malini : धर्मेंद्र यांना हेमा मालिनींच्या त्या गोष्टीला होता प्रखर विरोध… अभिनेत्रीनेच सांगितलं अखेरचं सत्य

July 28, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांनी रुपेरी पडद्यावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्याचसोबत त्यांनी राजकारणाच्या मैदानातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटात आप्लया कामाने अमीट ठसा उटवणाऱ्या हेमामालिनी या मथुरा मतदारसंघातून सलग खासदार म्हणून निवडून तर आल्या. पण त्यांचा राजकीय प्रवास मात्र इतका सहज नव्हता. विशेष म्हणजे, त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पती धर्मेंद्र यांना हा निर्णय मान्य नव्हता. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी त्यांच्या आयुष्यातील हा खास किस्सा शेअर केला. धर्मेंद्र हे सुरुवातीला त्यांच्या राजकारणात येण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते, असं त्यांनी स्वत:च स्पष्ट केलं.

मोठ्या गर्दीमुळे धर्मेंद्र व्हायचे अस्वस्थ

हेमा मालिनी यांनी सांगितलं की, निवडणूक प्रचारासाठी त्या देशभर फिरायच्या. अनेक ठिकाणी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमायची. मात्र हीच गर्दी पाहून धर्मेंद्र यांच्या मनात भीती निर्माण व्हायची. एवढचं नाही, तर त्यांना फक्त गर्दीच नव्हे तर हेलिकॉप्टर प्रवासाबाबतही धर्मेंद्र यांना काळजी वाटायची. “हे सगळं खरंच करायची खरंच गरज आहे का ?’ असं ते नेहमी मला विचारायचे. “सुरुवातीला धर्मेंद्रजी खूप काळजीत असायचे. मी जेव्हा मोठ्या सभांमध्ये जायचे, तेव्हा त्यांना माझ्या सुरक्षेची चिंता वाटायची. ते नेहमी सांगायचे – ‘इतक्या गर्दीत जातेयस, स्वतःची काळजी घे.’ असं हेमामालिनी यांनी नमूद केलं.

फक्त गर्दीच नाही तर हेलिकॉप्टर प्रवासाबाबतही धर्मेंद्र यांना काळजी वाटायची. ते अनेकदा विचारायचे, “हे सगळं खरंच करायची गरज आहे का?” त्यावर हेमा त्यांना सांगायच्या, “पक्षाची जबाबदारी आहे, त्यामुळे मला जावे लागेल.”

एका प्रचाराने बदलली आयुष्याची दिशा

हेमा मालिनी यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात एका खास अनुभवातून झाली. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अभिनेता विनोद खन्ना यांच्यासाठी प्रचार केला होता. याच काळात त्यांना आपल्या लोकप्रियतेची खरी जाणीव झाली. त्या आठवणी सांगताना हेमामालिनी म्हणाल्या, “जेव्हा मी प्रचारासाठी जायचे, तेव्हा एवढी मोठी गर्दी पाहून मला आश्चर्य वाटायचं. मी विचारायचे – ‘हे लोक खरंच मला पाहण्यासाठी आले आहेत का?’ आणि लोक हो म्हणायचे. तो अनुभव माझ्यासाठी खूप खास होता” असं त्यांनी नमूद केलं.

आईच्या एका सल्ल्याने घेतला मोठा निर्णय

राजकारणात येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी हेमा मालिनी यांनी सुरुवातीला नकार दिला होता. पण त्यांच्या आईने त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. हेमामालिनी म्हणाला, “माझ्या आईने मला सांगितलं की भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांसारखे मोठे नेते आहेत. त्यांनी मला म्हटलं – ‘तू लोकांचे खूप मनोरंजन केले आहेस, आता देशासाठीही काही कर. अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही .” आीचे हे शब्द माझ्या मनाला भिडले आणि मगच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

निवडणुकीपूर्वी ठेवली होती खास अट

राजकारणात प्रवेश करताना हेमा मालिनी यांनी भाजपसमोर एक खास अट ठेवली होती. त्यांना निवडणूक लढवायची होती, पण फक्त मथुरा मतदारसंघातून. त्या म्हणाल्या, “मी स्पष्ट सांगितले होते की, जर निवडणूक लढवणार असेन तर मथुरेतूनच लढेन. कारण भगवान श्रीकृष्णांशी माझे खूप भावनिक नाते आहे.” सुरुवातीला मथुरा जागा दुसऱ्या उमेदवारासाठी निश्चित करण्यात आली होती, मात्र नंतर ती हेमा मालिनी यांना मिळाली. त्या काळात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी आपल्याला खूप सहकार्य केल्याची आठवणही हेमामालिमी यांनी सांगितली.

ड्रीम गर्ल ते राजकारणातील लोकप्रिय चेहरा

‘सपनों का सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या हेमा मालिनी यांनी ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘जुगनू’ आणि ‘बागबान’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटसृष्टीतील यशानंतर त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवला. आज हेमा मालिनी या अभिनेत्री, नृत्यांगना आणि राजकारणी अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग
  • भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक
  • पोस्ट ऑफिसमधील PPF, SSY आणि SCSS खाती बँकेत ट्रान्सफर करता येतात का? जाणून घ्या पोस्टाचा अधिकृत नियम
  • ऋषभ पंत विकेटकिपिंग का करत नाही? अखेर तो धक्कादायक फोटो समोर आलाच; काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in