• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Heena gavit : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पदाधिकाऱ्याकडूनच माजी खासदार हिना गावितांना शिवीगाळ, थेट पोलिसांत पोहोचलं प्रकरण

July 28, 2026 by admin Leave a Comment


नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणामुळे भाजपमधी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी यांचे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. कधी अधिकारी, तर कधी पदाधिकारी तर कधी थेट मंत्र्यांसोबतच्या संवादाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. या ऑडिओ क्लिपमधून चौधरी आणि मंत्र्‍यांचे कथित संभाषण समोर येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. ऑडिओ क्लिप्समध्ये ‘एआय’च्या मदतीने छेडछाड केल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला आहे.

अनेक ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर चौधरी यांच्या मुलानेही पोलिसांत तक्रार दिली आहे. विजय चौधरी यांच्या मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा संवाद देखील व्हायरल झाला आहे. नंदुरबारमध्ये व्हायरल होणार्‍या ऑडिओतून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. एका ऑडिओ क्लिपमधून आमदार विजयकुमार गावित यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यात डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर डॉ. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्याविरोधात पोलिसांत जातिवाचक शिवीगाळ आणि इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे डॉ. हिना गावित यांच्या समर्थकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. या प्रकरणानंतर डॉ. हिना गावित यांच्या कार्यकर्त्यांनी विविध पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयात जाऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. तर भाजपमधून विजय चौधरी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पोलिस दलात मोठे फेरबदल, 43 अधिकाऱ्यांच्या बदल्या
  • Today Horoscope : या चार राशींच्या आयुष्याचा कायापालट होणार, धन, संपत्ती घरात येण्यास सुरुवात; वाचा राशिभविष्य!
  • एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन
  • पानफुटीची पाने गुणकारी, या 5 आजारांवर रामबाण उपाय, खाताच फरक जाणवतो…
  • NIA ची जुन्नरसह पाच ठिकाणी झाडाझडती, हाती लागला महत्त्वाचा पुरावा? तपासात आढळलं काय? दहशतवादी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in