• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gym Jihad : हादरवून सोडणारं जीम जिहादचं प्रकरण उघड, जीम ट्रेनर इमरान, मौलवी खलीलु रहमान हिंदू मुली, महिलांना पद्धतशीरपणे..

May 23, 2026 by admin Leave a Comment


हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, धर्मांतरण या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गँगस्टर कायद्याखाली 10 आरोपी निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील हे प्रकरण आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर हे पाऊल उचलण्यात आलय. महिला सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणाबाबत सरकार पूर्णपणे गंभीर आहे. अशा प्रकरणात कुठलीही चालढकल केली जाणार नाही. पोलीस तपासात या संपूर्ण प्रकरणात संघटित टोळीची भूमिका समोर आली आहे. जीम ट्रेनर इमरान खान आणि मौलवी खलीलु रहमानसह अन्य आरोपींनी जीममध्ये येणाऱ्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या धर्म परिवर्तनाचा कट रचला होता. जीम जिहादचं हे प्रकरण समोर आलं.

आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने महिलांशी संपर्क करुन त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनाक्रमाला संघटित गुन्ह्याच स्वरुप दिलं असा तपास यंत्रणांचा दावा आहे. चौकशी दरम्यान अनेक महत्वाचे पुरावे देखील मिळाले. त्या आधारावर पुढील कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात गँगस्टर कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना निश्चित केलं आहे. अधिकाऱ्यांनुसार ही कारवाई फक्त सुरुवातीचं पाऊल आहे. चौकशीत अजून पुढे नाव समोर येतील.

कोणालाही सोडणार नाही

महिलांविरुद्ध गुन्हे, जबरदस्त धर्मांतरण आणि संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या कुठल्याही व्यक्तीला सोडणार नाही याचा प्रशासनाने पुनरुच्चार केला. अशा प्रकरणात कठोर कारवाई सुरु राहिलं हे सुद्धा पोलिसांनी स्पष्ट केलं. संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी सुरु आहे.

महिलांशी शरीर संबंध ठेवायचे

एफआयआर दाखल झाल्यानंतर हे जीम बंद झाले आहेत. या जीम जिहादमध्ये जवळपास 50 महिलांना फसवण्यात आल्याची शक्यता आहे. जीम ट्रेनिंगच्या नावाखाली हे महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. या जीम जिहादमध्ये महिलांशी शरीर संबंध ठेवायचे. त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढून नंतर ब्लॅकमेल करायचे. पीडित महिलांकडून पैसे उकळायचे. त्यांना धर्मांतरणासाठी भाग पाडायचे. अलीकडेच कॉर्पोरेट क्षेत्रातही असचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. नाशिकच्या टीसीएस प्रकरणाने सगळ्या देशाला हादरवून सोडलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
  • बड्या नेत्याने दिला मंत्रिपदाचा राजिनामा! नेमकं कारण काय? राष्ट्रपतींनी तात्काळ…
  • बड्या सेलिब्रिटीचा खुलासा, 10 वर्षांच्या शाहरुख खानला समोसे विकताना पाहिलंय…, किंग खानचं मोठं रहस्य अखेर समोर
  • Vaibhav Sooryavanshi : आयर्लंड दौऱ्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला मिळालं मोठं सरप्राईज.. हॉटेल रूममध्ये काय घडलं ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in