
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी हे आंदोलन होणार असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मुंबईकडे वळवण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत.
सदावर्ते यांच्या मते, मनोज जरांगे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्यादे असून, ते विध्वंसक आणि देशद्रोही भाषा वापरत आहेत. बावनकुळे यांना डुक्कर तोंड्या म्हटल्यानंतरही शिंदे यांनी निषेध न केल्याचा मुद्दा सदावर्ते यांनी उपस्थित केला.
मंत्रालयातून आदेशाची वाट न पाहता जरांगे पाटलांना तातडीने अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांना सणासुदीच्या काळात आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटलांनी सुरुवातीला मुंबईत न येण्याचे आश्वासन दिले होते, मात्र नंतर त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे. सरकार केवळ तोंडदेखलेपणा करत असल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे.
Leave a Reply