
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला आहे” असे विधान केल्यानंतर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाच्या जोरावर सरकार बदलत नसून, विकासाच्या कामांवरच सरकारचे भवितव्य ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील म्हणाले, “एखादे आंदोलन केल्याने सरकार बदलत नाही. सरकार हे विकासावर अवलंबून असते. जो विकास करेल, तोच टिकेल. सध्या राज्यात विकासाचा पर्व सुरू आहे.” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलकांची भेट घेतली नसल्याच्या प्रश्नावरही गुलाबराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोणीतरी त्या ठिकाणी जाणे महत्त्वाचे आहे. मोदी गेले किंवा शाह गेले यापेक्षा सरकारच्या वतीने प्रतिनिधी जाऊन चर्चा करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
दरम्यान, आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Leave a Reply