• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Guess Who: 12 बॉयफ्रेंडनंतर नेपाळी उद्योजकासोबत लग्न आणि 2 वर्षांत घटस्फोट… आज असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री

July 19, 2026 by admin Leave a Comment


 

 

 

Guess Who: बॉलिवूडमध्ये अभिनेत्री त्यांच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आज अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघडपणे सांगतात. पण 90 च्या दशकात परिस्थिती आजसारखी नव्हती. अभिनेत्री कायम त्यांचं आयुष्य गुपित ठेवायच्या. अभिनेत्रींचे रिलेशनशिप, ब्रेकअप, लग्न.. याबद्दल फार कोणाला लवकर कळायचं नाही. पण यामधील काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्यांनी स्वतःच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, एक अशी अभिनेत्री आहे, जिचं लग्न तर झालं, पण वैवाहिक आयुष्याता आनंद अभिनेत्रीला फार काळ घेता आला नाही. आज पैसा, संपत्ती, प्रसिद्धी असून देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे…

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली. पण खासगी तिच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक उतार – चढाल आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. मनिषा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण सर्वकाही असून सुद्धा अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.

मनिषा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना तब्बल 12 सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. यामध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं देखील नाव आहे. दोघांमध्ये 20 वर्षांचं अंतर होतं. तेव्हा संपूर्ण बॉलिवूडमध्ये फक्त दोघांच्या नात्याची चर्चा रंगलेली. पण नाना पाटेकर आणि मनिषा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. कारण नाना पाटेकर विवाहित होते…

एक दोन नाही तर, तब्बल 12 सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक सम्राट दलाल याच्यासोबत लग्न केलं. पण मनिषा आणि सम्राट यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 2010 मध्ये नेपाळी रितीरिवाजांनुसार उद्योजक सम्राट दहलशी लग्न केलं. हे लग्न काठमांडूमध्ये झालं. पण लग्नाच्या दोन वर्षांत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

दरम्यान, 2023 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत मनिषा म्हणालेली, ‘लग्नबद्दल माझं एक स्वप्न होतं. जर तुम्ही कोणत्या वाईट नात्यामध्ये असाल तर, लवकरात-लवकर अशा नात्यातून बाहेर निघायला हवं. यामध्ये वाईट असं काहीही नाही. मी घाईमध्ये लग्न केलं, मी म्हणाली होती घाईत लग्न करण्याची सर्व जबाबदारी मी घेते… माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेम कधीच नव्हतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणालेली.

मुनिषा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मध्यंतरी अनेक वर्ष मनिषा बॉलिवूडपासून दूर होती. तिच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. त्यानंतर ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये अभिनेत्री दमदार भूमिका साकारली… आता सोशल मीडियावर मनिषा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in