• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs MI : मुंबईच्या विजयाचे 4 वैशिष्ट्य, एकटा तिलक वर्माच गुजरातवर भारी

April 21, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सोमवारी 20 एप्रिलपर्यंत 30 सामने खेळवण्यात आले. या 30 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. मुंबईच्या या विजयाची काही खास वैशिष्ट्य आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्य ही तिलक वर्मा याच्याशी संबंधित आहेत. (Photo Credit: PTI)

Tilak Varma Century Celebration

तिलक वर्मा याने गुजरात विरुद्ध झंझावाती खेळी केली. तिलकने 45 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. तिलकच्या टी 20 कारकीर्दीतील एकूण पाचवं आणि तर आयपीएलमधील पहिलं शतक ठरलं. (Photo Credit: PTI)

Tilak Varma Century GT vs MI

तिलकला या नाबाद शतकी खेळीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिलकची आयपीएल स्पर्धेत सामनावीर पुरस्कार जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit: PTI)

GT vs MI Tilak Varma Century

तिलकने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने गुजरातसमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातला एकट्या तिलकने केलेल्या धावाही करता आल्या नाहीत. तिलकने 101 धावा केल्या. तर मुंबईने गुजरातला 100 धावांवर गुंडाळलं. तिलक यासह प्रतिस्पर्धी संघापेक्षा सरस कामगिरी करणारा मुंबईचा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

Tilak Varma Century IPL 2026

मुंबईने गुजरातला 99 धावांनी पराभूत करत 19 व्या मोसमातील आपला दुसरा सामना जिंकला. मुंबईचा हा गुजरात विरुद्धचा अहमदाबादमधील पहिलावहिला तर एकूण दुसरा विजय ठरला. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता थेट 100 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्यामुळे मोठी खळबळ; अमेरिका थेट…जग हादरलं!
  • 250 वेळा ऑडिशन दिलं पण मिळाला नकार, शेवटी एका भूमिकेने बदललं आयुष्य, आज इंडस्ट्रीवर करतोय राज्य
  • इराण अमेरिका युद्धात खळबळ! भारतासह तब्बल इतक्या तेल शुद्धीकरण कारखान्यात हाहाकार, षडयंत्र की..
  • Gajkesari Yog : लक्ष्मी कुबेराच्या आशीर्वादाने दुप्पट प्रगती होणार, 5 राशींचे नशीब फळफळणार
  • तुमची ही चूक म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच, साप कधीच घरातून बाहेर जाणार नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in