• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमची ही चूक म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच, साप कधीच घरातून बाहेर जाणार नाहीत

April 21, 2026 by admin Leave a Comment


सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांना देखील उष्णता असाह्य होते. विशेष: सापांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. कारण साप हे हिवाळ्यात बिळामध्ये लपून बसतात, मात्र जसा उन्हाळा सुरू होतो, तशी जमीन तापू लागते. जमिनीच्या आत प्रचंड उष्णता तयार होते. या उष्णतेचा त्रास झाल्यानं साप बिळातून बाहेर पडतात. साप उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड जागेच्या शोधात असतात. त्यामुळे ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. यामुळेच उन्हाळ्यामध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. ते टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्यामुळे साप आपल्या घरात किंवा घराच्या परिसरामध्ये येण्याची दाट शक्यता असते.

गवत वाढू देऊ नका – अनेकांना बाग कामाची आवड असते, मात्र बागेकडं थोडं जरी दुर्लक्ष झालं की बागेतील गवत वाढतं, त्यामुळे या ठिकाणी लपण्यासाठी सापांना आयती जागा सापडते, तसेच इथे गवत वाढल्यामुळे थंडावा देखील जास्त असतो, त्यामुळे अशा ठिकाणी अनेकदा साप आढळून येतात त्यामुळे बागेतील गवत वाढू देऊ नका.

बागेला जास्त पाणी देऊ नका – उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त आहे, म्हणून आपण बागेला खूप पाणी देतो. त्यामुळे तिथे चिखल होतो. बागेत चिखल झाल्यास सापांचं खाद्य असलेले प्राणी जसं की उंदीर, घूस या सारख्या प्राण्यांची त्या ठिकाणी वाढ होते, त्यामुळे शिकारीच्या शोधात अशा ठिकाणी साप येतो, त्यामुळे झाडांना जेवढी गरज आहे, तेवढंच पाणी द्यावं.

शिळं अन्न उघड्यावर टाकू नका – जर तुम्ही शिळं अन्न तुमच्या घरासमोर उघड्यावर टाकत असाल तर त्यामुळे तुमच्या घराच्या परिसरात उंदरांची संख्या वाढू शकते, त्यामुळे साप देखील तुमच्या घरात घुसू शकतात.

घरात अडचण ठेवू नका – अनेकदा आपल्या घरात काही ठिकाणी अडचण असते, अशा ठिकाणी देखील सापांना लपण्यासाठी जागा मिळते, त्यामुळे घर स्वच्छ ठेवावं, ज्यामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत.

साप घरात आल्यास काय काळजी घ्यावी? जर समजा तुमच्या घरात साप घुसला तर घाबरून जाऊ नका, आणि त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका. ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. सापांना मारू देखील नका. सापाची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या, ते तुमच्या घरी येऊन सापांना रेस्क्यू करतील.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कानपूर हादरलं, 10 वर्षाच्या भावाला बांधून ठेवत 7 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार
  • प्रेमासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला, घटस्फोट होताच पुन्हा…दोन 2 लग्न केलेल्या अभिनेत्रीसोबत काय घडलं?
  • ड्रायव्हिंग शिकताय? ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, काही मिनिटांतच बनून जाल ‘प्रो’ ड्रायव्हर
  • IPL 2026: अक्षर पटेलने ठोकलं खास ‘शतक’, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केली कमाल
  • सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठा अपघात टळला, दोन लोकल समोरासमोर आल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in