• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता थेट 100 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांच्यामुळे मोठी खळबळ; अमेरिका थेट…जग हादरलं!

April 21, 2026 by admin Leave a Comment


Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जागतिक पातळीवरील सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा संपूर्ण जगावरच परिणाम पडतो. त्यांनी याआधी भारतासह इतरही काही देशांवर टॅरिफ लागू केला होता. या टॅरिफमुळे भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. इतरही देशांवरील टॅरिफमुळे जागतिक व्यापार आणि धोरण चांगलेच बदलले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेन न्यायालयाने ट्रम्प यांनी लागू केलेला टॅरिफ असंवैधानिक असल्याचे सांगितल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, सध्या एकीकडे इराण युद्धाचा मुद्दा जागाच्या केंद्रस्थानी असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचे अस्त्र बाहेर काढले आहे. त्यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लागू करू, अशी थेट धमकीच दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? कोणाला धमकी दिली?

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन सरकार कॅनडासोबतच्या व्यापाराबाबत असमाधानी आहे. अमेरिकेने आपले हे मत कॅनडापुढे अनेकदा बोलून दाखवलेले आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला गंभीर इशारा दिला आहे. तुम्ही चीनसोबतचा व्यापार करार न थांबवल्यास आम्ही तुमच्यावर 100 टक्के टॅरिफ लादू असं, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. अमेरिकन व्यापार हितासाठी आम्ही हे पाऊल उचलू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांच्या विधानाआधी अमेरिकन वाणिज्य विभागाचे सचिव हावर्ड लुटनिक यांनी कॅनडासोबतच्या व्यापारावर मत व्यक्त केलं. डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर अमेरिकेन व्यापार करारावर नियंत्रण ठेवण्यास कटिबद्ध आहेत. तसेच कॅनडाचे व्यापार धोरण खूपच खराब आहे, असे मत व्यक्त केले होते.

हा व्यापार करार सर्वात वाईट

लुटिनक हे मीडिया आउटलेट Semafor तर्फ आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी कॅनडावर थेट टीकादेखील केली. अमेरिका-मेक्सिको-कॅनडात (USMCA) एक व्यापार करार होणार आहे. यावर बोलताना हा सर्वात वाईट व्यापार करार आहे, असेही मत व्यक्त केले.

दरम्यान, आता ट्रम्प यांच्या या धमकीनंतर जागतिक पातळीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने कॅनडाला धमकी दिली, त्याच पद्धतीने ते भारत आणि इतर देशांनाही टॅरिफची भीती घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी कराच
  • SRH vs DC Toss : दिल्लीच्या बाजूने सलग सहाव्या सामन्यात टॉसचा कॉल, कॅप्टन अक्षर म्हणाला..
  • IPL 2026 : 7 विकेट्स घेत गोलंदाजाचा कहर, थेट पहिल्या स्थानी झेप, कोण आहे तो बॉलर?
  • रेखाच्या या 3 सिनेमांनी ओलांडल्या होत्या मर्यादा! आज यूट्यूबवर उपलब्ध, एकावर तर भारतात बंदी
  • ‘राजकारणात काम करणाऱ्या महिला राजकारण्यांसोबत बेडवर…’, खासदाराचे खळबळजनक विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in