
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी राजस्थानातील पचपदरा येथे एका रिफायनरीचे उद्घाटन करणार होते. सुमारे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले या प्रोजेक्टचे स्वप्न आता पूर्ण होणार होते. परंतू उद्घाटनाच्या एक दिवस आधीच या प्रकल्पाच्या रिफायनरीच्या मेन प्रोसेसिंग युनिट्सला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.त्यामुळे आता त्याचे उद्घाटन पुढे ढकलावे लागले आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( HPCL ) मध्ये रिफायनरीत लागलेल्या भीषण आगीच्या कारणांची चौकशी सुरु आहे. हैराणीची गोष्ट म्हणजे जगभरात ऑईल एसेट्स खास करुन रिफायनरींना आग लागण्याच्या घटनांचा एकच पॅटर्न नजर येत आहे. हे सर्व अशा वेळी होत आहे, जेव्हा पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धामुळे तेल आणि गॅस सारख्या महत्वाच्या नैसर्गिक संसाधनांचा एक हत्यार म्हणून वापर केला जात आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हवाई हल्ले सुरु केले आणि पश्चिम आशियात व्यापक सर्घषांची सुरुवात झाली आहे. त्यानंतर भारतासह सहा देशांच्या तेल रिफायनरींमध्ये आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व रिफायनरी युद्ध क्षेत्राच्या बाहेरील आहेत. या घटनांवरुन आता ही चर्चा वेगाने होत आहे की या रिफायनरींमध्ये लागलेल्या आगीच्या घटना केवळ योगायोग आहेत की या मागे एखादा पॅटर्न आहे.
गेल्या दोन महिन्यात अमेरिका, मेक्सिको, इक्वडोर आणि रशियाच्या रिफायनरीत आग लागल्याने गोंधळ उडाला. रशियाचे प्रकरण वेगळे आहे. कारण येथील तेल संयंत्रणेवर युक्रेनने हल्ले केले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु असून ते एकमेकांवर हल्ले करत आहेत. मात्र, उर्वरित देशातील रिफायनरीतील आगीच्या घटना प्लांटमधील तांत्रिक त्रुटी वा अंतर्गत समस्येने घडल्याचे म्हटले जात आहे.
भारतात सुद्धा दोन तेल कंपन्यात आग
भारतात सुद्धा दोन तेल कंपन्यात आगीच्या घटना समोर आल्या आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या राजस्थानच्या रिफायनरी शिवाय मुंबई किनाऱ्यावरील ऑईल एण्ड नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या ऑईल फिल्डमध्ये हादसा झाला. ओएनजीसीच्या या फॅसिलिटीत १२ एप्रिल रोजी आग लागली होती, त्यावर नियंत्रण मिळवले होते.
राजस्थानच्या पचपदरा रिफायनरीच्या आगीत इन्फ्रास्ट्रक्चरला कोणतेही गंभीर नुकसान पोहचलेले नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने सांगितले की घटनेच्या मूळ कारणांची चौकशी करण्यासाठी एक उच्च स्तरिय बैठक आयोजित केली आहे. एचपीसीएलने सांगितले की प्रारंभिक चौकशीतून कळाले आहे की हीट एक्सचेंजर सर्किटमध्ये व्हॉल्व आणि फ्लॅज या पैकी एकातून हायड्रोकार्बन लिक झाल्याने ही आग लागली होती.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तेल रिफायनरीत लागलेल्या या सर्व आगी एक अपघात असू शकतो. परंतू त्यांच्यात एक पॅटर्न नजरेस येत आहे. अमेरिकेच्या दोन ऑईल एसेट्स – वॅलेरो एनर्जी (Valero Energy)च्या पोर्ट आर्थर रिफायनरी आणि मॅराथन पेट्रोलियमच्या एल पासो रिफायनरीतही स्फोट आणि आगीची घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या रिफायनरीपैकी एकात आग लागल्याची घटना झाली आहे. आणि ती अजूनही संपूर्ण पणे चालू होऊ शकललीन नाही. इक्वाडोर आणि मेक्सिको येथील तेल रिफायनरीतही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
म्यानमार येथेही रिफायनरीत आग
म्यानमारच्या सागाईंग क्षेत्रात २० एप्रिल रोजी स्थित मॉबी रिव्हर पोर्ट वर शक्तीशाली स्फोट झाला. ज्यामुळे १० हून जास्त इंधन टँकरना आणि जहाजांना हानी पोहचली. आग वेगाने पसरली आणि टँकर जळून खाक झाले. इमर्जन्सी टीम आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अयशस्वी झाल्या आहेत. मंगळवारपर्यंत या आगीची धग कायम होती. एका एक्स युजरने पोस्ट केली आहे की भारताच्या तेल रिफायनरीत आग लागल्याला आता २४ तासही पूर्ण झाले नाहीत आणि आता म्यानमारच्या सागाइंग क्षेत्राच्या होमोलिन बंदरात झालेल्या मोठ्या स्फोटानंतर १० हून अधिक इंधन टँकरना आगीच्या भक्ष्यस्थानी घेतले आहे. आता हे हाताबाहेर गेले आहे.
Leave a Reply