• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs MI : मुंबईचा युवा स्टार अश्वनी कुमारचा तो एक खास चेंडू गुजरातच्या टीमला झेपलाच नाही, शुबमन गिलने सत्य मान्य केलं की..

April 21, 2026 by admin Leave a Comment

खराब फॉर्ममध्य असलेल्या मुंबई इंडियन्सला अखेर काल दुसरा विजय मिळाला. केकेआर विरुद्ध सलामीचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 सीजनची चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर टीमला सलग चार पराभवांचा सामना करावा लागला. अखेर काल गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने दुसऱ्या विजयाचा स्वाद चाखला. मुंबईच्या कालच्या खेळात टीम परफॉर्मन्स दिसला. शतकी खेळी करणारा तिलक वर्मा आणि अश्वनी कुमार मुंबईच्या विजयाचे खरे हिरो ठरले. क्रिकेट मध्ये एक चेंडू सुद्धा सामना फिरवण्यासाठी पुरेसा असतो. अश्वनी कुमारने काल घातक गोलंदाजी केली. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने ओव्हरमध्ये टाकलेल्या कुठल्या एका चेंडूमुळे सामना फिरला नाही, तर एकाच पद्धतीचा चेंडू त्याने वारंवार टाकला. मुंबई इंडियन्सचे पहिली फलंदाजी केली.

त्यांनी गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 200 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. यावेळी युवा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने कमाल केली. त्याने आपल्या भात्यातील लेंथ बॉलचा खुबीने वापर केला. गुजरात टायटन्सच्या टीमला अश्वनी कुमारने याच लेंथ बॉलच्या जाळ्यात अडकवलं. मॅच संपल्यानंतर अश्वनीकुमार आपल्या या लेंथ बॉल बद्दल बोलला. “मी फिल्डवर जाऊन पीच पाहिला, तेव्हा लेंथ बॉल जास्त परिणामकारक ठरेल हे माझ्या लक्षात आलं. याचं चेंडूचा जास्त वापर करण्याबद्दल मी विचार केला. मी हार्दिक सोबत मिळून प्लान बनवला. प्लानचा अमलबजावणी केली. मला रिझल्ट मिळाला” असं अश्वनी कुमारने सांगितलं.

शुबमन गिलने मान्य केलं की..

अश्वनी कुमारने 4 ओव्हर गोलंदाजी केली. 24 धावा देऊन त्याने 4 विकेट काढले. या 24 चेंडूत त्याने 2 बॉल फुल लेंथवर टाकले. 7 चेंडू गुड लेंथवर टाकले. अन्य 15 चेंडू शॉर्ट लेंथचे होते. अश्विनीला जे चार विकेट मिळाले ते शॉर्ट लेंथवर मिळाले. अश्विनीच्या या लेंथ बॉलने गुजरात टायन्सला निष्प्रभ केलं. धावांच्या हिशोबाने गुजरातला आयपीएलमधील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या मोठ्या पराभवाचं दु:ख गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिलच्या बोलण्यातूनही जाणवलं. त्याने मान्य केलं की, “मधल्या षटकांमध्ये लेंथ बॉल ज्या पद्धतीने आम्ही खेळला पाहिजे होता, त्यात आम्ही कमी पडलो”

एकाच चेंडूने गुजरातच्या टीमला हैराण केलं

लेंथ बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवर येत नव्हता. त्यात चढ-उतार होते. काही चेंडू येत नव्हते, तर काही येत होते. अनेक लेंथ बॉल खाली राहत होते. या एकाच लेंथ बॉलने गुजरात टायटन्सच्या टीमला हैराण केलं, हे स्पष्ट होतं.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • यावर्षी विसर्जनानंतरही थांबणार..; कोकणातील पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’
  • एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, पदरचे 10 ते 12 लाख खर्चून पहलगाममध्ये आदिल शहाच्या कुटुंबाला बांधून दिलं घरं
  • भारतात 100 वर्षे पूर्ण केलेली ऐतिहासिक रेल्वे स्थानके कोणती? तीन तर आपल्या महाराष्ट्रातच… तुम्हाला माहितीये का?
  • Uddhav Thackeray | जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र नेमकं कुणावर?
  • GT vs MI : आधी 22 चेंडूत 19 धावा, मग हार्दिक तिलक वर्माला असं काही बोलला की.. पुढच्या 23 चेंडूत तिलकच्या बॅटने विद्ध्वंस घडवला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in