
आयपीएल 2026 मध्ये तिलक वर्मा समोरच्या टीमचा कर्दनकाळ बनून फॉर्ममध्ये परतला आहे. 20, 0, 14, 1 आणि 8 अशा सुमार प्रदर्शनानंतर तिलक वर्माने 45 चेंडूत 101 धावांची वादळी खेळी केली. तिलक वर्माच्या फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सला काल गुजरात टायटन्स विरुद्ध 199 धावांचा डोंगर उभारता आला.
मुंबईने गुजरातवर 99 धावांनी विजय मिळवला. त्याचं श्रेय प्रामुख्याने तिलक वर्मा आणि अश्वनी कुमार या दोघांना जातं. तिलक वर्माकडून बऱ्याच दिवसांनी अशी फलंदाजी पहायला मिळाली. तिलक वर्मा टी20 स्पेशलिस्ट असून तो भारताच्या मधल्याफळीचा आधारस्तंभ आहे.
मूळात सामना सुरु झाला तेव्हा तिलक वर्मा स्लो खेळत होता. 22 चेंडूत त्याच्या 19 धावा होत्या. त्यानंतरच्या पुढच्या 23 चेंडूत सगळं चित्र बदललं. तिलकने पुढच्या 23 चेंडूत 82 धावा चोपल्या. यात सात सिक्स आणि आठ चौकार होते.
मुंबईची इनिंग सुरु असताना 14 व्या ओव्हरमध्ये तिलक वर्मा 19 धावांवर खेळत होता. त्यावेळी कॅप्टन हार्दिक पंड्या त्याच्याजवळ गेला व काहीतरी बोलला. हार्दिक त्याला काय बोलला हे माहित नाही.
पण त्यानंतर तिलक वर्माचा खेळच बदलून गेला. मैदानावर त्याने वादळं आणलं. फोर-सिक्सचा पाऊस पाडला. 14 व्या ओव्हरपर्यंत त्याने एक चौकार मारला नव्हता. तिलक वर्माने जणू काही अंगात संचारल्यासारखा खेळ दाखवला. गोलंदाजांवर तुटून पडला.




Leave a Reply