• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आशा भोसले यांची नात जनाईने पूर्ण केली आजीची अखेरची इच्छा

April 21, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 13 एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आता भोसले कुटुंबीयांकडून त्यांच्या अस्थींचं वाराणसीमध्ये विसर्जन करण्यात आलं. यावेळी आशा भोसले यांची नात जनाई भोसलेला अश्रू अनावर झाले. आजीच्या अस्थी विसर्जनानंतर जनाईने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. जनाईने एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कुटुंबीयांसोबत वाराणसीत बोटीन प्रवास करताना दिसून आली. गंगा नदीत आशा भोसले यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. त्यापूर्वी भोसले कुटुंबीयांकडून त्याठिकाणी सर्व विधी करण्यात आले.

बोटीवर आशा भोसले यांची सुंदर प्रतिमा होती आणि त्यासमोर पूजेची मांडणी करण्यात आली होती. त्यांच्या फोटोसमोर आनंद भोसले, त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगी जनाई प्रार्थना करताना दिसले. हा फोटो शेअर करत जनाईने लिहिलं, ‘ओम शांती.. आजा आशाईंच्या सर्वांत जवळच्या लोकांनी अत्यंत कठीण गोष्ट केली आहे. वाराणसीच्या गंगेत त्यांच्या अस्थींचं विसर्जन केलं आहे. पण हिच त्यांची अखेरची इच्छा होती आणि मला खात्री आहे की त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. मी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला विनंती करते की त्यांनी फक्त त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करावी.’

जनाईची पोस्ट-

आशा भोसले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांची नात जनाई भोसले पूर्णपणे खचली आहे. अंत्यविधीदरम्यान आणि त्यानंतर आयोजित केलेल्या शोकसभेत जनाईला सतत अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. ‘मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की, माझ्या आजीचा आदर करणारे असंख्य लोक आहेत. तिच्या अंत्यविधीला येऊन त्यांनी तिला तो सन्मान दिला आणि तिच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. मी सर्वांचे मनापासून आभार मानते. माझी आजी या आदरास आणि प्रेमास पात्र होती. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहील आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तिने हे सर्व पाहिलं असेल’, अशा शब्दांत जनाईने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आशा भोसले आणि जनाई यांच्यातील नातं खूपच खास होतं. जनाई तिच्या आजीच्या खूप जवळ होती. सोशल मीडियावर ती सतत त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करायची.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी कराच
  • SRH vs DC Toss : दिल्लीच्या बाजूने सलग सहाव्या सामन्यात टॉसचा कॉल, कॅप्टन अक्षर म्हणाला..
  • IPL 2026 : 7 विकेट्स घेत गोलंदाजाचा कहर, थेट पहिल्या स्थानी झेप, कोण आहे तो बॉलर?
  • रेखाच्या या 3 सिनेमांनी ओलांडल्या होत्या मर्यादा! आज यूट्यूबवर उपलब्ध, एकावर तर भारतात बंदी
  • ‘राजकारणात काम करणाऱ्या महिला राजकारण्यांसोबत बेडवर…’, खासदाराचे खळबळजनक विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in