• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda : ‘राइज अँड फॉल 2’ मध्ये गोविंदाची एंट्री ? होस्ट बनणार की स्पर्धक .. मोठी अपडेट समोर

September 1, 2026 by admin Leave a Comment


Govinda In Rise And Fall Season 2 : 90 च्या दशकातील सुपरस्टार, हीरो नंबर- 1 आणि 120 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलेला स्टार म्हणजेच गोविंदा (Govinda) . गेल्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या गोविंद आता सेकंड इनिंगसाठी सज्ज झाला असून लवकरच तो चित्रपटात झळकणार आहे. मात्र त्याचप्रमाणे तो एका रिॲलिटी शोमध्येही झळकू शकतो अशी चर्चा आहे. खरंतर, गोविंदाचे चाहते बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर त्यांच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पाहायचे आहे. गोविंदादेखील ‘रूपा’ आणि ‘दुनियादारी’ यांसारख्या चित्रपटांमधून कमबॅक करण्याची तयारी करत आहे. मात्र, आता त्यला ‘राइज एंड फॉल’ या रिॲलिटी शोसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मेकर्सशी त्याची चर्चाही सुरू असल्याचं समजतं.

‘राइज एंड फॉल’मध्ये होस्ट बनणार की स्पर्धक ?

‘राइज एंड फॉल’चा पहिला सीझन गेल्या वर्षी, 2025 मध्ये मध्ये आला होता. हा शो MX Player वर स्ट्रीम करण्यात आला होता. भारतपेचे सह-संस्थापक अशनीर ग्रोवर यांनी या शोचं होस्टिंग सूत्रसंचालन केलं होतं. आता निर्माते या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन आणण्याच्या तयारीत आहेत. ‘व्हरायटी इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, गोविंदाला या शोची ऑफर देण्यात आली असून त्याच्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र तो होस्ट म्हणुन नव्हे तर स्पर्धक म्हणून दिसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी गोविंदाही खूप उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.

याआधी केलं होतं रिॲलिटी शोचं सूत्रसंचालन

जर गोविंदा आणि शोच्या निर्मात्यांमधील चर्चा यशस्वी झाली, तर तो या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो. मात्र, गोविंदा हा काही पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत नाहीये. यापूर्वी तो ‘जीतो छप्पर फाड के’ या सोनी टीव्हीवरील गेम शो मध्ये दिसला होता. पण त्या शोमध्ये त्याने सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे ‘राइज एंड फॉल’मध्ये त्याची एंट्री झाली, तर स्पर्धक म्हणून हा त्याचं रिॲलिटी शोमधलं दार्पण असेल.

गोविंदा गेल्या 7 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही आणि तो मोठ्या प्रमाणात फ्लॉप ठरला. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी सुमारे 19 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, चित्रपटाची कमाई 1 कोटीही झाली नाही. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केवळ 40 लाख रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केल्याचं सांगितलं जातं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in