
Govinda: बॉलिवूडचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनिता अहुजाने गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले होते. त्यानंतर एअरपोर्टवर गोविंदाला अभिनेत्री कोमलसोबत पाहिलं गेलं. तेव्हापासून ही कोमल आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
कोमल ही राणी स्वर्णकार या नावानेही ओळखली जाते. ही नवोदित अभिनेत्री असून सध्या बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतेय. गोविंदाच्या आगामी 'रुपा' या चित्रपटाशी जोडली जाण्यापूर्वी कोमल विशेष चर्चत नव्हती. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे.
कोमलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, शिक्षणाबद्दल आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलची माहिती सार्वजनिक स्रोतांमध्ये मर्यादित आहे. तिच्या वयाबद्दलचीही माहिती अद्याप अस्पष्ट आहे. कोमलचं गोविंदासोबतचं नात अचानक चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे ती 'रुपा' या चित्रपटात गोविंदासोबत भूमिका साकारत आहे.
'रुपा'शिवाय ती गोविंदाच्या 'दुनियादारी' या चित्रपटातही झळकणार असल्याचं कळतंय. गोविंदा आणि कोमल नुकतेच मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. त्यांचं एकत्र दिसणं हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करताना 'कोमल'चं नाव घेतलं होतं.
सुनिताने आरोप केले होते, “तारुण्यात चुका होतात, पण वयाच्या 63 व्या वर्षी हे सर्व ऐकणं योग्य वाटत नाही.” यानंतर जेव्हा मुलाखतकर्त्याने ‘कोमल’ असं नाव घेतलं, तेव्हा सुनिता पुढे म्हणाली, “या नावातच जरा गडबड आहे. मला कोमल या नावाचा खूप तिरस्कार आहे. एक आहे कोमल… XYZ कोणीतरी.. मला तिचा खूप तिरस्कार आहे.”




Leave a Reply