• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate Today : सोनं स्वस्त झालं रे… 10 ग्रॅमच्या मंगळसुत्राला लागणार फक्त… वाचा भाव काय?

August 13, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही काळापासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहेत. आज (13 ऑगस्ट) सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोने 88 रुपयांनी स्वस्त झाले असून, सोन्याचा दर 1,54,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर बुलियन मार्केटमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. हा 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे. याआधी बुधवारी सोन्याच्या दरात 114 रुपयांची वाढ झाली होती, मात्र आज पुन्हा किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे.

दिल्लीतील आजचा सोन्याचा दर

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज सोन्याचा दर 1,54,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबईतील आजचा सोन्याचा दर

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,54,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. येथे सोन्याचा दर 55 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बिहारमधील आजचा सोन्याचा दर

बिहारची राजधानी पाटणा येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. येथे सोन्याच्या दरात 60 रुपयांची घसरण झाली आहे. पाटणामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

उत्तर प्रदेशातील आजचा सोन्याचा दर

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सोन्याचा दर 1,55,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. येथे सोन्याच्या दरात 70 रुपयांची घसरण झाली आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,42,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याचे दर घसरण्यामागची कारणे

  • आंतरराष्ट्रीय तणाव कमी : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान काही काळासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील घबराट कमी झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये होणारी खरेदी काहीशी कमी झाली. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही झाला आणि दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली.
  • डॉलर आणि कच्च्या तेलाच्या दरात बदल : सोन्याच्या किमतीवर डॉलर आणि कच्च्या तेलाच्या दरांचाही परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उच्च पातळीवर कायम आहेत, तर डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याची खरेदी महाग होऊ शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची मागणी कमी झाल्यास सोन्याच्या किमतीत घसरण झाली.
  • नफावसुली आणि बाजारातील चढ-उतार : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर काही गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी सोन्याची विक्री करतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलते भू-राजकीय वातावरण, 15 टक्के कर आणि रुपयाच्या हालचालीचाही देशांतर्गत सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in