• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

July 1, 2026 by admin Leave a Comment


जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा गोळा करताना आपणं व्हिडीओ, रिल्स किंवा बातम्यांमधून वाचलं आणि ऐकलं असेल. जापानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. त्यातून त्या देशात नियमांचं किती काटेकोरपणे पालन केलं जातं हे दिसून येतं. लहानशी चूकही घडणार नाही याची काळजी घेतली जाते. पण या जापान देशाला भूकंपाची शाप आहे. जापान हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसला आहे. त्यामुळे या भागात छोटे मोठे भूकंप होत असतात. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतं. कधी काय होईल सांगता येत नाही. अशा स्थितीतही जापानमध्ये उंच इमारती आहेत. तसेच भूकंपाचा तीव्र झटका लागली तरी त्या इमारतींना काही होत नाही हे विशेष.. मागच्या रविवारी ईशान्य जापानमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप आला. पण या भूकंपाच्या धक्क्यातही गगनचुंबी इमारतींना काही झालं नाही.

इमारती बांधण्यापूर्वी अशी काळजी घेतात

जापानच्या टोकियो, ओसाका आणि योकोहामासारख्या शहरात गगनचुंबी इमारती भूकंपाचा धक्का सहन करूनही उभ्या राहतील अशा बांधल्या आहेत. जापानमध्ये इमारती बांधण्यापूर्वी अभियंते दोन अत्यंत कठोर स्तरावर नियोजन करतात. इमारत तिच्या जीवनकाळात तीन ते चार मध्यम तीव्रतेचा भूकंप सहन करू शकेल. दुसरं, 1923 मध्ये ग्रेट कांटोमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाची तीव्रता विचारात घेणे. या दोन नियमांमुळे भूकंपाची तीव्रता अधिक असली तरी इमारतीला थोडं फार नुकसान होतं. पण पत्त्यासारखी कोसळत नाही.

भूकंपाची तीव्रता अधिक असली जमिनीवर लाटांसारखी कंपनं होतात. यात प्रचंड विनाशकारी उर्जा असते. पण ही विनाशकारी उर्जा रोखण्याची क्षमता इमारतीत असते. जापानच्या स्ट्रक्चरल इंजिनियरच्या मते, इमारती थेट जमिनीला भिडण्याऐवजी विनाशकारी ऊर्जा विसर्जित करतात. त्यामुळे इमारती कोसळत नाहीत. यासाठी जापानी शास्त्रज्ञ सिस्मिक आयसोलेशन नावाचं आधुनिक तंत्र वापरतात. पूर्ण बिल्डिंग जमिनीपासून किंचित वर असते. त्यामुळे कंपनं जमिनीपर्यंत पोहोचण्यापासून रोखली जातात.

इमारतीला जमिनीपासून वेगळं ठेवण्यासाठी खालच्या पायावर अत्यंत मजबूत आणि लवचिक रबर पॅड बसवले जातात. हे पॅड 30 ते 50 सेंटिमीटर जाड असतात. तसेच खास डिझाईन केलेले शॉक अॅबसॉर्बर बसवले जातात. त्यामुळे जोरात हादरे बसले तरी रबर पॅड स्प्रिंगप्रमाणे रोखतात आणि भूकंपाचे धक्के वरपर्यंत पोहोचत नाहीत. या तंत्रामुळे घरातील लोकांना सौम्य कंपनं जाणवतात.

इतकंच काय तर वरच्या मजल्यांसाठी खास सुरक्षा उपाययोजना असतात. इमारतीत विशेष मोशन डँपर्सचा वापर करतात. सायकलच्या पंपसारखे असताता. त्यात जाड तरल पदार्थ किंवा तेल असतं. त्यामुळे भूकंपाने इमारत एका बाजूला झुकली तरी विरुद्ध दिशेने दाब टाकून कंपण रोखली जातात. इतकंच काय तर इमारतीची बांधणी करताना सुसंगतपणे, सरळ आणि काटकोनात बाधंतात. सर्व पिलर एकाच ग्रिड रेषेवर असतात. त्यामुळे भूकंपाचा दाब समान वितरीत होतो. या तंत्रामुळे एखादा भाग कोसळण्याचा धोका नाहिसा होतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं….
  • GK : तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान
  • नवी मुंबईत तुफान पाऊस… उघड्या वायरींचं पाण्यात करंट, दोन मुलींना शॉक लागला; शहरात खळबळ
  • Explainer : आमदारांना 50 -50 कोटींची ऑफर, तामिळनाडूत सरकार पाडण्याचा कट उधळला, थलपतीला जे जमलं ते ठाकरेंना का नाही?
  • जागते रहो… मुंबईसाठी पुढचे 3 तास रेड अलर्टचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, हेल्पलाईन नंबरही जारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in