• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Explainer : आमदारांना 50 -50 कोटींची ऑफर, तामिळनाडूत सरकार पाडण्याचा कट उधळला, थलपतीला जे जमलं ते ठाकरेंना का नाही?

July 1, 2026 by admin Leave a Comment


तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वात जास्त 107 जागा मिळाल्या, त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन तामिळनाडूनमध्ये सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय हे राजकारणात अजून नवखे आहेत. मात्र तरी देखील सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणत तामिळनाडूच्या राजकारणात आपला पाय घट्ट रोवला. आता त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एकाचवेळी 15 आमदारांना राजीनामा द्यायला लावायचा आणि थलपती विजय यांचं सरकार अल्पमतात आणून ते पाडायचं असा हा डाव होता. मात्र गुप्तचर यंत्रणाच्या सतर्कतेमुळे हा डाव फसल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक देखील करण्यात आली होती. 15 आमदारांना प्रत्येकी 35 ते 50 कोटी रुपयांची ऑफर देखील त्यासाठी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  मात्र टीव्हीकेच्या एका आमदाराने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि सर्व कट उधळला गेला. मला स्वत:ला 35 लाखांची ऑफर देण्यात आली होती, असा दावाही या आमदाराने केला आहे. मात्र हा कट उधळून लावण्यात थलपती वियज यांना मोठं यश मिळालं आहे.

दरम्यान 2022 ला अशी स्थिती उद्धव ठाकरे यांची देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महायुती सरकार कोसळलं होतं. परंतु थलपती विजय हे राजकारणात नवखे असताना देखील त्यांनी हा कट वेळीच ओळखून हाणून पाडला आहे. त्यामुळे सध्या तरी सरकार सुरक्षित झालं आहे.  मात्र थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पूर्ण बहुमत नसल्यामुळे भविष्यात देखील असेच काही प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा या सर्व गोष्टींना थलपती विजय कसं तोंड देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in