• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : चार अंकांचाच का असतो एटीएम पिन? जाणून घ्या या मागचं कारण

July 10, 2026 by admin Leave a Comment


आधुनिक जगात वावरताना प्रत्येक गोष्टी कशा एका क्लिकवर होतात. मागच्या काही वर्षात बँकिंग तर खूपच सोपं झालं आहे. एखाद्याला पैसे देण्यापासून घेण्यापर्यंत सर्व काही चुटकीसरशी होत आहे. पण या मागे बरीच मेहनत आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण एटीएम कार्ड वापरतो. पण हे एटीएम कार्ड कसं सुरू झालं? त्याचा जनक कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेत असताना एटीएम पिन 4 अंकांचाच का असतो? याचं उत्तरही तुम्हाला या बातमीत मिळेल. जगातील पहिलं एटीएम स्कॉटलँडमध्ये जॉन शेफर्ड बॅरन यांनी तयार केलं होतं. त्यांनी 27 जून 1967 ला लंडनच्या एनफिल्ड भागात बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर हे एटीएम मशिन लावलं होतं. शेफर्ड बॅरन यांनी ही कल्पना एका चॉकलेट विकणाऱ्या वेंडिंग मशीन पाहून आली होती. त्यात एक दिवस बँक बंद असल्याने त्यांना पैसे काढता आले नाहीत. मग त्यांच्या मनात विचार आला की जसं मशिनमधून चॉकलेट निघतं तसं मशिनमधून पैसे काढले जाऊ शकतात.

शेफर्ड बॅरन यांनी एटीएम मशिन तयार केलं. पण मशिनमधून पैसे काढताना अफरातफर होऊ नये आणि खातं असलेल्या व्यक्तीलाच पैसे कसे काढता येतील यावर विचारविनिमय सुरू झाला. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच पिन कोड टाकण्याची कल्पना सुचली. शेफर्ड बॅरन हे आर्मीत होते, त्यामुळे त्यांनी सहा अंकी पिन ठेवण्याचा विचार केला. म्हणजेच जितके नंबर अधिक तितका पिन अधिक मजबूत राहिल. त्यामुळे त्यातून काही चोरी वगैरे करणं शक्य होणार नाही. पण जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला 6 पिन लक्षात ठेवण्यास सांगितला आणि ट्विस्ट आला.

शेफर्ड बॅरन यांची पत्नी कॅरोलिन हा सहा अंकी नंबर आठवताना संभ्रमात पडली. तेव्हा तिने त्यांना सांगितलं की, मला फक्त चार नंबर आठवत आहेत. त्यापेक्षा जास्त नंबर लक्षात ठेवणं कठीण आहे. पत्नीचं हे म्हणणं शेफर्ड बॅरन यांनी लक्षात ठेवलं आणि पिन नंबर 4 अंकी केला. शेफर्ड बॅरन यांचा हा निर्णय बँकिंग क्षेत्रासाठी मोलाचा ठरला. जगभरात एटीएम मशिनचा वापर वाढला, तसा चार अंकी नंबर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. पण चार अंकी नंबर लक्षात ठेवणं सोपं आहे, पण सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत नाही.

चार अंकांख्या पिनमुळे 10 हजारापर्यंत शक्यतो आकडेवारी जुळवता येते. म्हणजेच 0000 ते 9999 पर्यंत.. जर हा फिन सहा अंकी असता तर ही आकडेवारी लाखांच्या घरात गेली असती आणि त्याची आकडेवारी करणं कठीण गेलं असतं. पण तरीही चार अंकी पिन प्रभावी ठरत आहे. कारण एटीएममध्ये तीन वेळा चुकीचा पिन टाकला तर कार्ड ब्लॉक होते. त्यामुळे चार अंकी पिन सुरक्षित मानला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in