
किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: जळगावच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात विस्तवही जात नाही. दोघांतील कलगीतुरा एका कार्यक्रमातून समोर आला. महाजनांनी नाथाभाऊंवर जिव्हारी लागणारी टीका केली. आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक करताना मंत्री महोदयांनी आपली तोफ पुन्हा मुक्ताईनगरमधील नेत्यावर (Girish Mahajan Criticized Eknath Khadse) फिरवली. या ताज्या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकारणाला उकळी फुटली. मंत्री गुलाबराव पाटील यांनाही महाजनांनी चिमटा काढला. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाल्याचे म्हटले.
आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक
मोठी दूरदृष्टी ठेवून आमदार मंगेश चव्हाण यांनी विकास काम केली आहेत… कोणत्या भाषेत अभिनंदन करावा आणि कौतुक करावं यासाठी देखील माझ्याकडे शब्द नाही. त्यांनी निवडलेली माणसे, कामाच्या दर्जा एवढा उत्कृष्ट आहे हे कुणालाही हेवा वाटावा. महाराष्ट्रात कुठे नसेल एवढ तरी दर्जेदार काम आहे. आमदार मंगेश चव्हाण यांचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जाहीरपणे भाषणात कौतुक केले.
पूर्वीसारख्या चिंधी चोरी नाही त्यामुळे एवढे दर्जेदार काम होऊ शकतं. कारण पूर्वी कुठल्याही काम करायचं म्हटलं तर मला काय? अशा पद्धतीने व्हायचं आता टक्केवारी मी सांगणार नाही. मंगेश चव्हाण याला पहिल्यांदा विधानसभेचे तिकीट देताना मी खूप भानगडी करून तिकीट दिलं होतं माझे प्रतिष्ठानला लावून तिकीट दिलं होतं. चार हजार मतांनी निवडून आला आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला. पुढच्या मंगेश दादाने आपल्या सर्वांना माझे टाकलं आणि तो 86 हजार मतांनी निवडून आला. एवढ्यावर मंगेश दादा थांबायचं नाही. तुम्हाला आमचं 7 टर्म चे रेकॉर्ड मोडायचा आहे. ते मोडतील याबाबत कोणाच्या मनात शंका नाही. मंगेश दादा मध्ये मी उद्याचा भाजप मधला नेता बघतो आहे. आम्ही आता आणखी किती दिवसात एखादी टर्म होऊ शकते.माझं वय मी आता या ठिकाणी सांगत नाही नाहीतर पुन्हा मंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी टीका टिप्पणी करतील, असा चिमटा मंत्री गिरीश महाजन यांनी काढला. तर मी लहान आहे. गुलाबराव पाटील मोठा भाऊ आहे असे महाजन म्हणताच एकच हश्या पिकला. तर गुलाबराव पाटील म्हणाले की मी महाजनांमपेक्षा लहान आहे.
नाथाभाऊंवर जहरी टीका
आपणही कुठेतरी थांबला पाहिजे स्मशानात जाईपर्यंत मीच. उठल्या जात नाही बसल्या जात नाही तरी पण मी. बंद करा, असे राहिले तर लोकांना चालणार नाही. नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे यांना टोला लगावला. भविष्यात ज्याच्याकडे आपण जिल्ह्याची जबाबदारी देऊन जाणार आहे तो नेता कसा असला पाहिजे तर त्याचं योग्य उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण आहे. बारा वर्षापासून मोदीचे पंतप्रधान आहेत देशाचे चित्र बदलला आहे तुम्ही बघितला असेल आता सर्वच ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहेत देशभरात कुठेही जा. कुठलीही निवडणूक नसताना आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली एक प्रकारे आपण शेतकर्यांना आधार दिला आहे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
Leave a Reply