• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?

June 12, 2026 by admin Leave a Comment


जळगावमधील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेश्मा काळे या ‘नॉट रिचेबल’ नसून त्या सध्या प्रचारात सक्रिय असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले की, रेश्मा काळे यांच्याशी सातत्याने संपर्क असून त्या निवडणूक प्रचारात सहभागी होत आहेत. त्याचबरोबर त्या उद्या आपली उमेदवारी मागे घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाजन यांनी आणखी एक मोठा दावा करत महाविकास आघाडीतील काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार देखील महायुतीच्या संपर्कात असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडी सुरू असून आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे निर्णय समोर येऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, रेश्मा काळे यांच्या संभाव्य माघारीच्या चर्चेमुळे जळगावमधील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, विधान परिषद निवडणुकीत कोणते नवे राजकीय घडामोडी घडतात याबाबत उत्सुकता वाढली आहे.  



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut: त्यांच्या घरात बॉम्ब… संजय राऊत यांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब, मुंबई पोलिस आयुक्तांकडे ती गंभीर तक्रार
  • पोलिसांसमोर सिया गोयल हिने उघड केले मोठे गुपित, पोलिसही चक्रावले, थेट केतन अग्रवाल याच्या..
  • थोडीतरी लाज बाळग, तुझ्या मुलाला काय तोंड दाखवणार? शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर आर. माधवनवर चिडले नेटकरी
  • Sanjay Jadhav : इच्छा नसताना मला..ठाकरेंचे फुटलेले खासदार संजय जाधव यांची प्रामाणिक कबुली
  • Venezuela Earthquake : जमीन थरथरली, इमारती कोसळल्या; रस्त्यावर लोकांची धावपळ, भूकंपाचे ५ भयंकर व्हिडिओ पाहून हादरा बसेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in