
मुंबईतील घाटकोपर साकीनाका गौसिया चाळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेवर मुंबईच्या महापौर रितू तावडे बोलल्या आहेत. “काही जण आत अडकल्याची भिती आहे. अगदी युद्ध पातळीवर फायर ब्रिगेड, मुंबई महापालिकेचे कर्मचारी तिथे काम करतायत. मी स्वत: घटनास्थळी जाऊन आले आहे. अविनाश ढाकणे साहेब तिथे आहेत. इतकी अरुंद गल्ली आहे की, एक-एक दगड हाताने बाजूला करावा लागत आहे. अतिशय वाईट दुर्घटना घडली आहे” असं महापौर रितू तावडे म्हणाल्या. स्थानिकांचा रोष पहायला मिळतोय, त्या प्रश्नावर महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “संपूर्ण फायर ब्रिगेड, मुंबई महापालिकेचे कर्मचारी तिथे काम करतायत. एकच व्यक्ती ये-जा करु शकतो इतका बोळ आहे. अग्निशमन दल, फायर ब्रिगेड दगड, माती बाहेर काढण्याचं काम करतायत”
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply