• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gen Z ने राहुल गांधींना विचारलं तुम्ही लग्न कधी करणार? अखेर एका वाक्यात आलं उत्तर

August 8, 2026 by admin Leave a Comment


राहुल गांधी यांनी जेनजी जनरेशनपर्यंत पोहोचण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आस्क मी एनिथिंग हे सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचं आदोलन, महिलांचं शिक्षण आणि इतर राजकीय विषयावर जेनजीशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. यावेळी त्यांना नेहमी विचारण्यात येणारा एक प्रश्न विचारण्यात आला. राहुलजी, तुम्ही लग्न कधी करणार? हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अखेर मौन सोडलं. एका वाक्यात उत्तर दिलं.

आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये त्यांना लग्नाबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी हलक्या फुलक्या अंदाजात उत्तर दिलं. बऱ्याच काळापासून मला हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. आता त्यावर उत्तर देण्याची वेळ आली आहे, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, त्यानंतर त्यांनी या विषयावर काहीच उत्तर दिलं नाही. त्यावर बोलणं टाळलं.

शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त

झारखंडमध्ये जेपीएससीच्या भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून राज्यात आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी या आंदोलनाशी संबंधित प्रश्नही राहुल गांधी यांना विचारला. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं. सर्व पक्षाच्या सरकारांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशातील विद्यार्थी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

शिक्षण व्यवस्था महागडी आणि दमनकारी

मी कोटा आणि डेहराडूनमध्येही हेच म्हटलं होतं. इस्लामाबादमध्येही हेच सांगेल. आमची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. आपली शिक्षण व्यवस्था अत्यंत महागडी आणि दमनकारी आहे. प्रत्येक सरकारने, मग ती काँग्रेस सरकार असो, झारखंड सरकार असो… सर्वांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकायला हवं. शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी एक पाऊल टाकलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांना बरोबरीने किंवा त्याही पेक्षा अधिक उच्च स्थान मिळालं पाहिजे. भारतातील महिला आमची सर्वात मोठी ताकद आहे. समाज, आपली शिक्षण व्यवस्था वा कार्पोरेट सेक्टरमध्ये महिलांसोबत जी वर्तवणूक केली जाते, ती मला पसंत नाहीये. तुम्ही आत्मविश्वास ढळू देऊ नका. लढवय्या बना. शक्तीशाली बना. तुम्ही जशा आहात, तशाच राहा. आम्ही पूर्णपणे तुमच्यासोबत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आवडता नेता कोण?

यावेळी राहुल गांधी यांना भाजपातील त्यांचा आवडता नेता कोण? असं विचारण्यात आलं. त्यावर एकच हशा पिकला. राहुल गांधी यांनीही या प्रश्नाचं उत्तर मोकळ्या मनाने दिलं. त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव घेतलं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध होते, असं सांगतानाच अमरिंदर सिंग यांच्या मिलिट्री हिस्ट्रीची माहिती देत त्यांनी कौतुक केलं. या सेशनमध्ये त्यांना आणखी एक खुमासदार प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही बॅटमॅन आहात का? असा सवाल त्यांनी करण्यात आला. त्यावर त्यांनी हसत हसत उत्तर दिलं. यावर मी फक्त एवढंच सांगू शकेल की कुणीच मला आणि बॅटमॅनला एकत्रित एका रुममध्ये पाहिलेलं नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in