
‘लॉकअप 2’ हा रिॲलिटी शो सध्या बराच चर्चेत असून सोशल मीडियावरही ट्रेंड होतोय. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी स्पर्धक असून टीव्हीवरचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोलाही या शोमध्ये सहभागी झाली आहे. आल्यावर पहिल्या दिवसापासूनच तिने केलेल्या विविध खुलाशांमुळे प्रचंड खळबळ माजली असून चाहत्यांनाही धक्का बसलाय. शोमध्ये आल्या आल्याच आकांक्षाने खुलासा केला होता की, ती आणि गौरव घटस्फोट घेत आहेत.गेल्या एका वर्षापासून ती गौरवपासून वेगळी राहत असल्याचंहीव आकाक्षाने नमूद केलं. एवंढच नव्हे तर आपण बायसेक्शुअल असल्याचा मोठा गौप्यस्फोटही आकांक्षाने या शोमध्ये केला . तिच्या या वक्तव्यांनी प्रचंड खळबळ माजली असून गौरव आणि तिच्या नात्याबद्दलही चर्चांना उधाण आलंय.
त्यातच आता एक मोठा ट्विस्ट आला. कारण अभिवेता गौरव खन्ना या शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. शोमध्ये तो येताच, त्याला समोर पाहून आकांक्षाला आनंद lतर झाला पण ती भावूकही झाल्याचे दिसून आलं.
‘लॉकअप 2’मध्ये गौरव खन्नाची एंट्री
“ आता व्हिजिटिंग अवर्स सुरू झाले आहेत. आज आपल्याला भेटण्यासाठी पहिले पाहुणे येत आहेत.” असं टीव्ही अभिनेत्री आणि होस्ट फराह खानने शोमध्ये जाहीर केलं. ही घोषणा होताच कोण येणार यावरून घरातील सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर अभिनेता गौरव खन्नाने दिमाखदार अंदाजात शोमध्ये प्रवेश केला. गौरवच्या एंट्रीने घरातील वातावरण आनंदी झालं. ‘एक समंदर है जो काबू में है. एक कतरा है जो संभाला नहीं जा रहा. एक उम्र बितानी है उसके वगैहर और एक लम्हा है जो मुझसे गुजारा नहीं जा रहा है’ असं तो येताना म्हणाला. त्याचे हे शब्द ऐकून सर्वांचं लक्ष वेधले गेलं.
View this post on Instagram
मात्र आकांक्षाला पाहून तो जे बोलला त्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. “तू तर माझा बँडच वाजवलास” असं तो हसत तिला म्हणाला. त्याच्या या संवादानंतर दोघांमधील जुन्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या. त्याला पाहून आकांक्षा भावूक झाली, तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.
गौरव-आकांक्षा टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चेतलं कपल
सांगायचं झालं तर, गौरव खन्ना आणि आकांक्षा हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होतं. जेव्हा गौरव बिग बॉसमध्ये सहभागी झाला, त्यावेळी आकांक्षाने पाहुणी म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. त्या काळात दोघांच्या नात्याची आणि त्यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. या शोनंतरही गौरव आणि आकांक्षा अनेकदा एकत्र दिसले होते. गौरवने आकांक्षाचा वाढदिवसही खास पद्धतीने साजरा केला होता. दोघांना एकत्र पाहून चाहतेही खूप खुश होते.
2016 मध्ये लग्न, मात्र नंतर नात्यात दुरावा
काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गौरव आणि आकांक्षाने 2016 साली थाटामाटत लग्न केलं. मात्र, ‘लॉकअप 2’मध्ये आकांक्षाने गौरवपासून वेगळे राहण्याबाबत केलेल्या वक्तव्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटाच्या घोषणेने तर सगळेच चक्रावले. या शोमध्ये आकांक्षाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला की ती बायसेक्शुअल आहे. लग्नाआधी तिचं अनेक मुलींशी रिलेशन होतं, असंही ती म्हणाली.
(@its_.ayy)
Leave a Reply