• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gas Cylinder Booking : आता 3 तासात LPG सिलिंडर घरी पोहोचणार, नवी योजना आली, सकाळी 6 वाजता बुकिंग केल्यास…

August 8, 2026 by admin Leave a Comment


Gas Cylinder Booking : घरातील गॅस सिलिंडर संपले की मोठी पंचाईत होऊन जाते. गॅस बुक केल्यानंतर सिलिंडर लगेच मिळत नाही. काही ठिकाणी तर दोन-तीन दिवसांची वाट पाहावी लागते. त्यामुळे या काळात घरात स्वयंपाक कसा करावा? असा प्रश्न गृहिणींना पडतो. दरम्यान, हीच अडचण होऊ नये म्हणून आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अवघ्या तीन तासात गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यासाठीची नेमकी योजना काय आहे? तसेच नियम काय आहे? ते जाणून घेऊ या…

अवघ्या तीन तासांत मिळणार गॅस सिलिंडर

इंडियन ऑईल या कंपनीने आता बाजारात ‘इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ’ या नावाने नवी गॅस सिलिंडर वितरण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 10 किलो वजन असलेला गॅस सिलिंडर दिला जाणार आहे. हा गॅस सिलिंडर हलका आणि गंजरोधक असेल. विशेष म्हणजे हा गॅस बुक केल्यानंतर तो अवघ्या तीन तासांत तुम्हाला घरी आणून दिला जाणार आहे. या गॅस सिलिंडरची सर्वात खास बाब म्हणजे तो पूर्णपणे पारदर्शक असणार आहे. म्हणजेच तुमच्या गॅस सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, ते तुम्हाला दिसणार आहे.

इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ नेमकी काय योजना आहे?

इंडियन ऑईल कंपनीने बाजारात आणलेल्या या गॅस सिलंडरचे नाव ‘इंडेन एक्स्ट्रालाइट नाऊ’ असे आहे. हा एकूण दहा किलो वजनाचा गॅस सिलिंडर असून तो आधुनिक कंपोझिट एलपीजी सिलेंडर आहे. हा गॅस सिलिंडर गंजरोधक असल्यामुळे तो जास्त टिकाऊ असेल. तुम्हाला गॅस किती शिल्लक आहे, ते सहज दिसेल. छोट्या आणि लहान कुटुंबांसाठी हा गॅस सिलिंडर सोयिस्कर आहे. भागातील कुटुंबे, कामकाजी व्यक्ती आणि छोट्या कुटुंबांसाठी विशेष सोयीस्कर असेल. दरम्यान, तुम्हाला नवीन कनेक्शन किंवा गॅस रिफिल करायचे असेल तर IndianOil ONE अॅप, IndianOil Customer Portal तसेच 7588888824 या व्हॉट्सअॅप क्रमांकांचा वापर करता येईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in