
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने जेतेपदच मिळवलं नाही तर काही विक्रमही रचले आहे. अंतिम सामन्यात अतिरिक्त वेळेत खेळलेल्या खेळात स्पेनने एक गोल मारला आणि विजयी ट्रॉफीवर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून स्पेनने इटलीचा विश्वविक्रम मोडला. (Photo: PTI)
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटीनाला पराभूत केलं. मग इटलीचा विक्रम मोडण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. या रेकॉर्डचा संबंध विजयाशी आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक वेळा विजयी राहण्याशी निगडीत आहे. (Photo: PTI)
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यातील विजय पकडून हा स्पेनचा सलग 38वा विजय होता. स्पेनने 2024 पासून आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. यापूर्वी सलग सामने जिंकण्याचा विक्रम इटलीच्या नावावर होता. इटलीने 2018 ते 2021 या कालावधीत 37 सामने सलग जिंकले होते. (Photo: PTI)
स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून विश्वविक्रम रचला आहे. यासह स्पेनने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात कमी गोल खाणारा संघ ठरला आहे. या स्पर्धेत स्पेनविरुद्ध फक्त एकच गोल झाला आहे. यासह एकाच विश्वचषकात सर्वाधिक सात क्लीन शीट्सचा विक्रमही त्यांनी प्रस्थापित केला.(Photo: PTI)
स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डी ला फ्यूएंटे यांच्या नावावरही विक्रम रचला गेला आहे. फीफा वर्ल्डकप जिंकणारे सर्वात वयस्कर मुख्य प्रशिक्षक ठरले आहेत. त्यांनी वयाची 65 वर्षे आणि 29 दिवस पूर्ण केले असताना हा मान मिळवला आहे. (Photo: PTI)




Leave a Reply