• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: तोंडावर हात ठेवला तर रेड कार्ड! 5 सेकंदात खेळ सुरू करायचा; जाणून घ्या नवे नियम

June 3, 2026 by admin Leave a Comment

फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जून 2026 पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहे. या स्पर्धेसाठी 48 देशांचे संघ अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभाग होत आहे. दुसरीकडे, या वर्ल्डकप स्पर्धेत बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच होणार आहे. यंदा फिफाकडून काही नवे नियम लागू केले आहेत. त्यामुळे सामन्यातील चुका आणि दिरंगाई यावर लगाम कसली जाईल. त्यामुळे सामने अधिक पारदर्शकपणे होण्यास मदत होणार आहे. चला जाणून घेऊयात नवे नियम काय आहेत ते…

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आठ नवे नियम

  • फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या नव्या नियमानुसार, खेळाडूंना आता हाताने तोंड झाकून लपूनछपून बोलता येणार नाही. खेळाडू मैदानात ही ट्रिक वापरून विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत बोलत असतात. पण आता तसं करता येणार नाही. तसं काही करताना दिसलं तर थेट रेड कार्ड दाखवलं जाईल.
  • थ्रो इन, कॉर्नर किक किंवा पेनल्टी दरम्यान चेंडू मैदानात येण्यापूर्वीच एखाद्या खेळाडूने फाउल केला, तर व्हिडीओ असिस्टंट रेफरी त्याची शहनिशा करून पेनल्टी करू शकतो. व्हिडीओ असिस्टंट रेफरी सध्या सामना सुरू असताना हस्तक्षेप करतो.
  • रेफरीने चुकीचा कॉर्नर किक दिला किंवा त्याच सामन्यात दुसऱ्यांदा एखाद्या खेळाडूला पिवळे कार्ड दाखवले, तर या दोन्ही प्रकरणात व्हिडीओ असिस्टंट रेफरी हस्तक्षेप करून निर्णय बदलू शकतो.
  • थ्रो इन किंवा गोल किकच्या वेळी मैदानातील खेळाडू किंवा गोलकीपर सर्वात जास्त वेळ घेतात. पण आता 5 सेकंदांचं काउंटडाउन असेल. जर त्यात अयशस्वी झाले तर विरोधी संघाला थ्रो इन किंवा कॉर्नर किक मिळेल.
  • संघांनी 10 सेकंदाच्या आता खेळाडू बदलणं अनिवार्य असेल. अन्यथा बदली खेळाडूला एक मिनिटं थांबावं लागले. त्यामुळे संघाला एक मिनिटं एका खेळाडूशिवाय खेळावं लागेल.
  • जर एखाद्या संघांना रेफरीच्या निर्णयाविरुद्ध किंवा अन्य कारणास्तव मैदान सोडले, तर शिक्षा म्हणून संपूर्ण संघाला लाल कार्ड दाखवले जाऊ शकते.
  • सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याला मैदानात परण्यासाठी एक मिनिटं मैदानाबाहेर थांबावं लागेल. त्यानंतर बरा होऊन मैदानात परतू शकेल.
  • गोलकीपर जखमी झाला आणि वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत असेल तेव्हा कोणत्याही संघाच्या खेळाडूंना तांत्रिक क्षेत्रात म्हणजेच डगआऊटमध्ये जाऊन प्रशिक्षण कर्मचाऱ्यांशी बोलता येणार नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in