• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

July 22, 2026 by admin Leave a Comment


यंदाचा विश्वचषक 2026 हा स्पेनने जिंकला. अर्जेंटिनाला फायनल फेरीत पराभवाचा झटका दिला आणि स्पेनने फिफा विश्वचषक 2026 जिंकला. स्पेनने विश्वचषक जिंकला पण याचा फायदा आता मिया खलिफाला झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिया खलिफा, न्यू जर्सीमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली. स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला 1-0 ने हरवून 16 वर्षांत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मिया खलिफाने फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनच्या विजयावर मोठी रक्कम लावली होती. मियाने तिच्या जिंकलेल्या रकमेचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिने स्पेनच्या विजयावर अंदाजे 10 लाख डॉलर्सची पैज लावली होती. स्पेन चॅम्पियन बनताच, मियाला  16.5 लाख डॉलर्स मिळाले, जे भारतीय चलनात अंदाजे 14 कोटी रुपये आहेत.

मिया खलिफाने स्पेनचा युवा स्टार लॅमिन यामलची जर्सी घालून सामन्याला हजेरी लावली होती. स्पेनची लॉटरी जिंकल्यानंतर, मियाने इन्स्टाग्रामवर एका विनोदी कॅप्शनसह एक पोस्ट शेअर केली, “मला स्पेनच्या या तरुण रक्तावर आणि त्यांच्या क्षमतेवर सुरुवातीपासूनच पूर्ण विश्वास होता. आज याच विश्वासाने मला कोट्यवधींचा मालक बनवले आहे. माझ्यात स्पॅनिश रक्ताचा एक थेंबही नाही, तरीही मला माझ्या देशाचा, स्पेनचा अभिमान आहे. एक मोठा विजय आहे.” मिया खलिफा मूळची लेबनॉनची आहे, पण आता ती अमेरिकेत राहते. ती सुरुवातीला अडल्ट इंड्रस्टीत कामाला होती. नंतर तिने या व्यवसायातून स्वत:ला दूर केले आणि आता ती सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील फायनल सामना एक रोमांचक आणि चुरशीचा होता. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, आणि अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने 11 उत्कृष्ट बचाव करून स्पेनला रोखून धरले. अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या मिनिटांमध्ये फेरान टोरेसने एक शानदार गोल करून स्पेनला 1-0असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्पेनचे हे दुसरे विश्वचषक विजेतेपद असून, विजेत्या संघाला अंदाजे 51 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही जिंकलो असतो पण तो आडवा आला… शुभमन गिलने कोणाला व्हिलन ठरवलं? सरळ नाव घेत म्हणाला की..
  • Nepal Flood: नेपाळच्या महापुरातून थोडक्यात बचावला अभिनेता; जिथे 12 तासांपूर्वी फोटो काढले, तिथेच आला महाप्रलय
  • रात्र सरताच दिवसा तरंगायला लागले मृतदेह, भूतनाथ तलावात भयंकर प्रकार; 5 दिवसापूर्वी घडलं असं काही की… लोकांमध्ये एकच भीती!
  • ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
  • IND vs SL: भारतीय संघाचं काम सोप केलं, संधीचं सोनं केलं, तरीही रिकाम्या हाताने घरी जावं लागलं, पडिकलमुळे झाला ‘गेम’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in