
किलियन एम्बाप्पेची फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चमकदार कामगिरी सुरूच आहे. फ्रान्सच्या स्टार स्ट्रायकरने स्वीडन विरुद्ध दोन गोल मारले. या गोलमुळे संघाला विजय तर मिळवून दिला, त्याचबरोबर एक विक्रमही नावावर केला. (GETTY IMAGES)
एम्बाप्पे वर्ल्डकपच्या बाद फेरीत सर्वाधिक गोल मारणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने बाद फेरीत आतापर्यंत एकूण 10 गोल मारले आहेत. आता हा एक विक्रम असणार आहे. (GETTY IMAGES)
एम्बाप्पेने यासह ब्राझीलचा दिग्गज लियोनिडास आणि रोनाल्डो यांना मागे टाकलं आहे. एम्बाप्पेने 2018 मध्ये पहिला वर्ल्डकप खेळला होता. म्हणजेच वर्ल्डकप खेळण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे बाद फेरीत त्याने अर्जेंटिनाविरुद्ध 5 गोल मारले हे विशेष.. तर पोलँडविरुद्ध 2 आणि क्रोएशियाविरुद्ध 1 गोल मारला. आता स्वीडनविरुद्ध दोन गोल मारले आहेत. (GETTY IMAGES)
एम्बाप्पे फिफा वर्ल्डकप स्पर्धेत युरोपियन संघाकडून सर्वाधिक गोल मारणारा खेळाडू ठरला आहे. एम्बाप्पेने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 18 गोल मारले आहे. जर्मनीच्या स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोजचा 16 गोलचा विक्रम त्याने मोडीत काढला. (GETTY IMAGES)
फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल मारणाऱ्या लियोनल मेस्सीपासून एक गोल दूर आहे. मेस्सीच्या नावावर 19 गोल आहेत. तर एम्बाप्पे 18 गोलसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मेस्सीचा विश्वविक्रम संकटात आहे. (GETTY IMAGES)




Leave a Reply