• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : ट्रेंडमध्ये आहेत सुखलेली फुलं, जाणून घ्या घरात ठेवणं शुभ की अशुभ?

June 12, 2026 by admin Leave a Comment


सध्याच्या काळात मार्केटमध्ये सुकलेल्या फुलांना मोठी मागणी आहे. लोक या फुलांचा वापर आपल्या घराच्या सजावटीसाठी करत आहेत. एवढंच नाही तर काही जण तर या फुलांना एखाद्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून देखील देत आहेत. मात्र अशा प्रकारचे फुलं घरात ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. फेंग शुई हे एक चीनी वास्तुशास्त्र आहे. फेगं शुईमध्ये सुखलेल्या फुलांना यिन ऊर्जा अर्थात सकारात्मक ऊर्जा रोखणाऱ्या ऊर्जेच्या स्वरुपात पाहिलं जातं. त्यामुळे अशा फुलांचा वापर हा खूप विचारपूर्वक करावा असा सल्ला फेंग शुई शास्त्रात देण्यात आला आहे. जर तुम्ही कुठेही या फुलांचा वापर केला तर फायद्यापेक्षा तुमचं नुकसानच अधिक होऊ शकतं, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. फेंग शुईनुसार सुखलेल्या फुलांची सजावट कधीही आपल्या बेडरूममध्ये करू नये. यामुळे पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. घरात काहीही कराण नसताना सारखी भांडणं होतात, त्यामुळे अशी फुलं बेडरूममध्ये ठेवू नये.

जर समजा तुम्ही तुमच्या घरात इतर ठिकाणी सजावटीसाठी सुखलेल्या फुलांचा वापर करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. या फुलांवर कधीही धूळ जमा होऊ देऊ नका, तसेच जर या फुलांमध्ये एखादं तुटलेलं फुल असेल किंवा खराब झालेली फुलं असतील तर ती लगेच काढून टाका, त्यांना घरात ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्याचा परिणाम हा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. यामुळे भविष्यात तुम्हाला काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीची फुलं घरात ठेवू नये, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

फेंग शुईनुसार सुखलेल्या फुलांपेक्षा सजावटीसाठी ताजी फुलं हे अधिक चांगली असतात. ताजी फुलं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून आणतात, तर सुखलेली फुलं ही सकारात्मक ऊर्जेच्या मार्गातील अडथळा बनतात. सुखलेल्या फुलांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. त्यामुळे घरात कधीही सुखलेल्या फुलांऐवजी ताजी फुलं ठेवावीत असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे. तसेच घराच्या सजावटीसाठी किंवा तोरणासाठी प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर करू नये, त्यासाठी खरी आणि ताजी फुलं वापरावीत असंही फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in