• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FDAच्या कारवाईनंतर सैराटमधील अभिनेता अरबाज शेखचा यूटर्न? घेतला मोठा निर्णय

July 9, 2026 by admin Leave a Comment


‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अरबाज शेख. या सिनेमात सल्याची भूमिका साकारणाऱ्या अरबाजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगत एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. मात्र रुग्णालयाकडून पैशांची लूट होत असल्याचे त्याने सांगितले होते. व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांकडे मदत करण्याची विनंती केली होती. अरबाजच्या आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर ते सील करण्याचे आदेश देण्यात आले. या सगळ्यानंतर अरबाजने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

अरबाजने काय निर्णय घेतला?

सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये आपल्या वडिलांच्या झालेल्या लुटीबाबत सोशल माध्यमांवर तक्रार केल्यानंतर अरबाज शेखने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. FDA (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) च्या कारवाईनंतर अरबाज शेखने पुन्हा एकदा सोशल माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याने सांगितले की, मी खाजगी हॉस्पिटलच्या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र, त्यानंतर मला असंख्य फोन कॉल्स आणि मेसेजेस येऊ लागले. यामुळे मी तो व्हिडीओ डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मानले सर्वांचे आभार

अरबाज शेखने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, “माझे वडील आणि कुटुंबीय यांच्याकडे लक्ष देणे हे मला सध्या सर्वात जास्त गरजेचे वाटते. त्यामुळे हा विषय इथेच संपवतो.” यासोबतच त्याने कठीण काळात आपल्यासोबत उभे राहिलेल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

अरबाज शेखच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. नोबेल हॉस्पिटल प्रकरणात FDAने आधीच कारवाई सुरू केली असल्याने आणि आता अरबाजने व्हिडीओ काढून घेतल्याने प्रकरणाला नवे वळण आल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडीओमध्ये काय होतं?

अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापूरमधील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधांची खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप अरबाजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून केला. व्हिडीओमध्ये तो स्पष्ट म्हणाला की वडिलांच्या औषधांचे बिल या मेडिकलमध्ये 40 हजार रुपये झाले, तेच बाहेर 20 हजारांपर्यंत आले असते. खाजगी रुग्णालयाकडून अशा प्रकारची लूट सुरू असल्याचे देखील त्याने पुढे सांगितले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच एफडीएने कारवाई केली. मेडिकल सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता अरबाजने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ डिलिट केल्याचे समोर आले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंना जे जमलं नाही ते आता ममता बॅनर्जी करून दाखवणार? बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढल्या, तृणमूलच्या गोटातून सर्वात मोठी बातमी
  • आगीची भीषण घटना 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू, इस्लामाबादमधील रुग्णालयाला आग..
  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय
  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in