• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी नवीन मुहूर्त… दत्तात्रय भरणे यांनी सांगितली नवीन तारीख, का होतोय कर्जमुक्तीला विलंब?

July 14, 2026 by admin Leave a Comment


Farmer Loan Waiver: राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषातील बदलांची माहिती देत ही घोषणा केली. पण कर्जमाफीला कधी मुहूर्त लागणार याची प्रतिक्षा कायम आहे. 30 जून रोजीपर्यंत कर्जमाफी होणार होती. राज्यपालांची स्वाक्षरी झाली नसल्याचे निमित्त पुढे करत 5 जुलै असा मुहूर्त ठरला. तोही हुकला. आता अर्धा जुलै संपत आला आहे. कर्जमाफीची तारीख पे तारीख मिळत असल्याने शेतकरी वैतागला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरीच्या वारीदरम्यान कर्जमाफीची नवीन तारीख सांगितली आहे.

कर्जमाफीची नवीन तारीख काय?

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी कर्जमाफीविषयी माहिती दिली. जुलै महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचा दावा भरणे यांनी केला. पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आली. कर्जमाफीच्या निकषांमध्ये थोडाबहुत बदल झाल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. आता सरकार नवीन आश्वासन पाळते की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

का लागत आहे कर्जमाफीला वेळ?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त दुसर्‍यांदा हुकला, त्यासाठी नवीन निकष कारणीभूत ठरला आहे. आयकर भरणारे शेतकरी किती? याचा डाटा केंद्र शासनाकडून मागवला आहे. हा डाटा येईपर्यंत कर्जमाफी देता येणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. त्यातच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी कर्जमाफीला विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

आमदार रोहित पवारांचा मोठा दावा

तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. लाडकी बहीण योजनेत निकष बदलले आणि आयकर भरणाऱ्या, सरकारी नोकरी आणि वेतन घेणाऱ्या बहिणी बाद करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेसाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्याच धरतीवर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती वेळखाऊ असल्याचे त्यांनी इंगित केले. या सर्व दावे-प्रतिदाव्यांमध्ये कर्जमाफी अडकली आहे. ऑगस्टपूर्वी कर्जमाफी न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in