• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Explained: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडिओ का केला? 5 कारणं आली समोर; मित्रों ऐवजी…

July 24, 2026 by admin Leave a Comment


23 जुलै, 2026 रोजी रात्री 11:52 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट केला. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या व्हिडिओची आता सर्वत्र चर्चा होत आहे. स्टुडिओ सेटअपची किंवा कॅमेरासमोर उभे न राहता पंतप्रधान मोदींनी यावेळी हटके पद्धतीने व्हिडिओ बनवला. त्यांच्या मोबाईल फोनचा सेल्फी कॅमेरा वापरला आणि इन्स्टाग्राम रील तयार केल्याप्रमाणेच पोर्ट्रेट मोडमध्ये हा व्हिडिओ शूट केला. जेन झीपर्यंत पोहोचायचे असेल तर टीव्हीवर अधिकृतपणे घोषणा न करता त्यांनी रिल बनवणं पसंत केले. कारण आता जेन झींमध्ये पोहोचायचे असेल किंवा त्यांना एखादा मुद्दा सांगायचा असेल तर त्यांच्याप्रमाणे रिल करुनच पोहोचता येईल हे मोदींना समजले आणि त्यांनीही अशीच पद्धत जाणून घेऊन व्हिडिओ शेअर केला.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो भाषणे दिली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी ‘माझ्या प्रिय देशवासियांनो’ किंवा ‘मित्रो’ म्हटले आहे. यावेळी, त्यांनी व्हिडिओमध्ये ‘friends’ असं म्हणून सुरुवात केलेली दिसली. हा काही योगायोग नव्हता. ‘मित्रो’ हा शब्द बूमर्स आणि जनरेशन एक्सच्या आठवणी जागवतो. सभा आणि मंचावरील कार्यक्रमांमध्ये वापरली जाणारी भाषा. पण ‘Friends’ हा शब्द इंस्टाग्राम, रील्स या जगाला जोडणारा शब्द आहे.

Gen  Z स्टाईल व्हिडिओ का केला?

  • कॅमेरा सेटअप: पोर्ट्रेट, स्टुडिओ नाही; मोबाईल, लँडस्केप नाही.
  • पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ असो किंवा राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण, त्यांचे व्हिडिओ संदेश नेहमीच कॅमेरा सेटअपमध्ये शूट केलेले दिसले आहेत. जसे की  बॅकग्राउन्डमध्ये तिरंगा, योग्य लाईट, मूळात सेल्फी कॅमेरा नसायचा. पण या व्हिडिओमध्ये सेल्फी कॅमेरा पाहायला मिळाला. फ्रंट अँगलने शूट व्हिडिओ शूट केला.
  • मोठा कॅमेरा नाही, तर एक सामान्य मोबाईल फोन.
  • सेल्फी आणि रील्ससाठी सामान्यतः वापरला जाणारा सेल्फी कॅमेरा.
  • इंस्टाग्राम रील्स किंवा शॉर्ट्सप्रमाणे व्हर्टिकल व्हिडिओ अँगल.

असा व्हिडिओ करण्यामागचे कारण म्हणजे हा तोच फॉरमॅट आहे ज्यामध्ये Gen Z त्यांचे रील्स तयार करतात, मित्रांना टॅग करतात आणि त्यांचे डेली व्लॉग शूट करतात. पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक अशी पद्धत निवडली. ज्याप्रमाणे Gen Z ने आंदोलनांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया रणनीतीचा त्यांच्याच विरोधात शस्त्र म्हणून वापर केला, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओद्वारे तेच शस्त्र उचलले.

व्हिडिओची वेळ: रात्री 11:52, सरन्यायाधीशांच्या बैठकीच्या अगदी आधी व्हिडिओची वेळ देखील खूप धोरणात्मक होती. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडिओ 23 जुलै रोजी रात्री 11:52 वाजता पोस्ट केला. CJP सरकारसोबतची बैठक 24 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता नियोजित होती. याचा अर्थ असा की, पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांच्या बैठकीच्या जवळपास 12 तास आधी हा व्हिडिओ पोस्ट केला. यावरून हे स्पष्ट होते की, सरकारला चर्चेपूर्वी आपला अजेंडा निश्चित करायचा होता. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की, मंत्रिमंडळाची बैठक 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता होईल आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पंतप्रधान मोदींनी फास्ट्रेकची घोषणा केली आणि सांगितले की पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात एक नवीन विधेयक सादर केले जाईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon: नेपाळमध्ये विध्वंसानंतर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा कहर, IMD चा 26 राज्यांना अलर्ट, छत्री सोबत राहू द्या
  • सोनलची थेट तुलना केली सचिन तेंडुलकरशी! बीसीसीआय अधिकाऱ्याच्या पोस्टने वादाला फोडणी
  • जेवण करून आंदोलन करा… नरहरी झिरवळ यांचा अजब सल्ला; पत्रकारांनी घेरताच काढता पाय
  • दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
  • Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता, तितक्यात पुराने त्याला गिळलचं होतं, पण..देव तारी त्याला कोण मारी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in