• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs PAK लॉर्ड्स कसोटीत हायव्होल्टेज ड्रामा; इम्रान खान यांच्या मुलांच्या मुलाखतीवरून वादाला फोडणी, शेवटी झालं असं…

August 28, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 9 गडी गमवून 248 धावा केल्या आहे. असं असताना या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेक सुरू होण्यापूर्वी या सामन्यात मुलाखतीचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लागलीच आक्षेप घेत स्काय स्पोर्ट्सशी संपर्क साधला आणि सामन्यावर बहिष्काराची धमकी देऊन टाकली होती. त्यामुळे मैदानात काही काळ तणावाचं वातावरण होतं. स्काय स्पोर्ट्सने इंग्लंडचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचे पुत्र कासिम आणि सुलेमान खान यांची घेतलेली मुलाखत प्रसारित केली. या मुलाखतीत इम्रान खान यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत आणि अंधुक होणाऱ्या दृष्टीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर कसोटी सामन्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या आक्षेपानंतरही चॅनेलने 18 मिनिटांची मुलाखत प्रसारित केली. ही मुलाखत इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी घेतली. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्या मुलांना बोलतं केलं. सुलेमान आणि कासिम खान यांनी या मुलाखतीत इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वडिलांच्या जीवाला धोका असून तुरुंगात योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप केला. ही मुलाखत क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपणात राजकीय मुद्द्यांना हात घालणारी होती असा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. त्यामुळे लंच ब्रेकनंतर पाकिस्तान खेळाडू मैदानात उतरणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.

Pakistan threatened Lord’s Test boycott after broadcaster Sky Sports telecast interview with Imran Khan’s two sons which was actually recorded at the Lord’s Long Room a day before the Test. PCB wanted SKY not to air the interview during Lunch break else they wouldn’t take the… pic.twitter.com/Z6CGuC6I75

— Vikrant Gupta (@vikrantgupta73) August 27, 2026

पाकिस्तान संघाच्या बहिष्काराच्या पावित्र्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मध्यस्थी केली. त्यानंतर हे प्रकरण कसंबसं निवळलं आणि खेळाडू मैदानात परतले. दरम्यान, ही मुलाखत सुरू असताना पाकिस्तानातील सरकारी चॅनलने आपल्या देशात प्रक्षेपण पूर्णपणे ब्लॅकआऊट केलं होतं.

इम्रान खान 73 वर्षांचे असून ऑगस्ट 2023 पासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरूंगात आहे. त्याने या प्रकरणी 14 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण राजकीय सूडापोटी कारवाई केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान रावळपिंडी येथील तुरूंगात असून तीन वर्षांहून अधिक काळ तुरूंगवास भोगला आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Special Report : एकामागून एक महाआपत्ती… नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?
  • Chitra Wagh : राजकारणात काम करतांना महिलांना अनेक..रितू तावडे, किशोरी पेडणेकरांना भेटल्यानंतर चित्रा वाघ यांचं महत्वाचं विधान
  • रक्षाबंधनावर आधारित हे गाणं ऐकून डोळ्यांत येईल पाणी, चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त
  • थलपती विजय आता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, नव्या सर्व्हेमुळे राहुल गांधींची चिंता वाढली, नेमकी आकडेवारी काय
  • सचिनला येतीये सीमा हैदर अन् मुलांची आठवण, रडायला लागला, व्हिडीओमध्ये म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in