• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NZ 1st Test : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी सज्ज, किती वाजता सुरुवात होणार?

June 3, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला (England vs New Zealand 1st Test) गुरुवारी 4 जूनपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत एकूण 3 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळी अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टॉम लॅथम याच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. या निमित्ताने पहिल्या कसोटी सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना गुरुवारी 4 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंडकडून कोणत्या एकाला डच्चू?

इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यासाठी 48 तासांआधीच 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ओली रॉबिन्सन याचं कसोटी संघात 2 वर्षांनंतर कमबॅक झालंय. तर दोघांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि कॅप्टन बेन स्टोक्स 12 पैकी कोणत्या एका खेळाडूला डच्चू देऊन प्लेइंग ईलेव्हन निश्चित करतात हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 115 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने त्यापैकी सर्वाधिक 54 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला इंग्लंड विरुद्ध केवळ 14 सामन्यांतच यश आलं आहे. तसेच उभयसंघातील 47 सामने अनिर्णित राहिली आहेत.

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), गस ॲटकिन्सन, सॉनी बेकर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, बेन डकेट, एमिलियो गे, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर) आणि जॉश टंग.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in