• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs IND : टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 वर्षांच्या खेळाडूला संधी

June 22, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला (India Tour Of England 2026) 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 टी 20i आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर आता 22 जून रोजी यजमान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी 20i मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हॅरी ब्रूक या मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

कुणाला संधी?

टी 20i मालिकेसाठी इंग्लंड संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. युवा ऑलराउंडर जेमन्स कोल्स याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. जेम्सने वयाच्या 16 व्या वर्षी फर्स्ट क्लास डेब्यू केलं होतं. जेम्सने स्वत:ला बॅटिंगसह बॉलिंगनेही सिद्ध केलं आहे. त्यामुळे जेम्सला पदार्पणाची संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तसेच निवड समितीने टी 20i मालिकेसाठी जॉर्डन कॉक्स, टॉम बॅटन आणि फिल सॉल्ट यांनाही संधी दिली आहे. तर ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन हे दोघे अनफिट आहेत. त्यामुळे या दोघांचा टी 20i मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

इंग्लंड-इंडिया टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 1 जुलै, रात्री 10 वाजता, चेस्टर ली स्ट्रीट

दुसरा सामना, 4 जुलै, संधथ्याकाळी 7 वाजता, मँचेस्टर

तिसरा सामना, 7 जुलै, रात्री 10 वाजता,नॉटिंघम

चौथा सामना, 9 जुलै, रात्री 10 वाजता, ब्रिस्टॉल

पाचवा सामना, 11 जुलै, संध्याकाळी 7 वाजता, साउथम्पटन

टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जॉश टंग आणि ल्यूक वुड.

इंग्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि प्रिंस यादव.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Hybrid home loan: हायब्रिड होम लोन म्हणजे काय? EMI वाढीचा का होत नाही परिणाम? एका क्लिकवर जाणून घ्या
  • आखाती युद्धामुळे पालिका विद्यार्थ्यांना छत्री पुरविल्या नाहीत, कंत्राटदाराचं अजब उत्तर
  • जत तालुक्यात पाणीटंचाई आणि इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन
  • MPSC Paper Leak : जो पेपरफुटीचा मास्टरमाईंट तो तर आदर्श शिक्षक! अमृत पाटीलबाबत चकित करणारी नवी माहिती
  • पुणं पुन्हा हादरलं! उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, प्रॉपर्टी हवी म्हणून केलं जायचं टॉर्चर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in