
गेल्या वर्षी पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने अख्खं राज्य सुन्न झालं होतं. जमीन खरेदी करण्यासाठी तुझ्या घरच्यांकडून दोन कोटी रुपये घेऊन ये असा तगादा तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता. तसेच तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. या प्रकरणामुळे राज्य धगधगत होतं, मात्र याच- अशाच गोष्टीची आता पुनरावृत्ती झाली असून हुंडाबळी प्रकरणाने पुन्हा शहर हादरलं आहे. वैष्णवी हगवणे नंतर वाकड मधूनच ही घटना समोर आली असून पिंपरी-चिंचवड येथील उच्चभ्रू कुटुंबात हा प्रकार घडलाय. शिल्पा सचिन गवारे नामक विवाहीत महिलेचा मृत्यू झाला असून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply