• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Eknath Shinde : विरोधकांना चर्चेऐवजी संसदेबाहेर फक्त स्टंटबाजी करण्यात रस, एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

August 13, 2026 by admin Leave a Comment


विरोधकांचं फक्त राजकारण सुरू आहे, त्यांना संसदेत चर्चा करायची नाहीये, त्यांना फक्त बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे. विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचं खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचं नाटक करायचं आहे, असा सवाल विचारत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे 20 मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर, आंदोलकांवर पॅलेट गनने गोळीबार करण्यात आल्याचा आरोप असून याच मुद्यावरून संसदेतील वातावरण तापलेलं आहे. विरोधक याच मुद्यावरून आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जंतरमंतरवरील गोळीबाराबद्दल सरकार संसदेत भूमिका मांडायला तयार आहेत, गृहमंत्री अमित शहा त्यावर बोलणार आहेत. मात्र त्यास विरोध दर्शवण्यात आल्याचे दिसून आलं. आम्हाला शाह यांचं भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही, त्यांचं लेक्चर ऐकायचं नाहीये, असं म्हणत अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी हाँ टोला लगावला. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे, असं म्हणत शिंदे यांनी खडेबोल सुनावले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

जनतेला सर्वांच काम माहीत आहे. पंतप्रधान मोदींचं काम देशाने पाहिलं, अमित शाह यांचंकामही जनतेला माहीत आहे. त्यामुळेच मी फक्त एवढंच म्हणेन की देशातील140 कोटींची जनता मोदीजींसोबत आहे. जे युवक आहेत, तरूण पिढी आहे, ते देशांचं भविष्य आहे. मोदीजींनी पटापाट निर्णय घेतले, कठोर कायद्याची तरतूद केली. 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटींचा दंड, फास्ट ट्रॅकमध्ये केस अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या ना. अजून काय करायला पाहिजे ? असा सवाल शिंदे यांनी विचारला. त्यामुळेच राजकारण करण्याचं विरोधकांचं दुकान बंद झालं, म्हणूनच विरोधकांनाा संसदेतील चर्चेत रस नाही, तर त्यांना बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

त्यांना राजीनाम्याच्या मागणीशिवाय दुसरं काय येतं ? आधी त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला, आंदोलकांची ही मागणी मान्य करून शिक्षणमंत्री प्रधानांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सोपवला. पण विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचं खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचं नाटक करायचं आहे, असा सवालही शिंदे यांनी विचारला.  ते ( राहुल गांधी) नेहमी परदेशात जाऊन देशांची, पंतप्रधान मोदींची बदनामी करतात. विरोधी पक्षनेत्याने अत्यंत गंभीरपणे आपली जबाबदारी निभावली पाहिजे, असं पार्ट-टाईम राजकारण करून चालत नाहीत, असा टोला शिंदे यांनी लगावला.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in