• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!

June 30, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील चेंबूर परिसरात आज एक धक्कादायक अपघात घडला. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. “मी आत्ताच राहुल शेवाळे आणि तुकाराम काते यांच्याशी बोललो आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. दुःखद बाब म्हणजे यामध्ये एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
  • Rahu Gochar: सावधान! राहू गोचरामुळे सिंहसह या ४ राशींच्या वाढतील अडचणी, होऊ शकते मोठे नुकसान
  • Rohit Pawar | ‘आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न… रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
  • Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
  • Success Story : पाचवी नापास… UPSC परीक्षेत 3 वेळा अपयश, पण ती मागे हटली नाही; चौथ्या प्रयत्नात बनली IAS

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in