• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या नुसत्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेने भाजपमध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी, चारजणांनी फडणवीसांना साकडं घातलं की..

July 14, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यात अस्वस्थता पसरल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जळगाव जिल्ह्यातील भाजपा आमदारांसह चार निवडक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवाला प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहू नये असं जळगाव भाजपने फडणवीसांना साकडं घातल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडताना खडसेंच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास जिल्ह्यात चुकीचा संदेश जाईल, अशी भीती व्यक्त केली. फडणवीस यांनी या सर्व नेत्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, मात्र अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला जायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

नुकतीच केंद्राच्या राजकारणात सक्रीय असलेले महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चा सुरु झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं की, “मला भाजपात प्रवेश करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही.मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहीन. माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत. ते भाजपमध्ये जातील मी जाणार नाही” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

नंतर ते हळूहळू राजकारणात मागे पडत गेले

एकनाथ खडसे हे महाराष्ट्र भाजपमधील एकेकाळचे महत्वाचे नेते होते. भाजपचा राज्यभरात विस्तार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी छाप उमटवली होती. 2014 विधानसभा निवडणुकीच्यावेळी ते सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्वाच्या खात्यांची जबाबदारी होती. पण या दरम्यान त्यांच्यावर जमीन घोटाळ्यासह अन्य काही आरोप झाले. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतर ते हळूहळू राजकारणात मागे पडत गेले. अखेर 2020 मध्ये त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in